ETV Bharat / state

Instructions To Rana couple : हनुमान चालिसा प्रकरणी गैरहजर राणा दाम्पत्याला, नियमित हजर होण्याचे निर्देश

author img

By

Published : Jul 14, 2023, 6:03 PM IST

हनुमान चालिसा प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीच्या वेळई राणा दाम्पत्य कायम गैरहजर राहत असल्या बद्दल न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत तसेच सुनावणीसाठी स्वत: नियमित हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता 10 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. (Instructions To Rana couple)

Instructions To Rana couple
राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणारच असा हट्ट राणा दाम्पत्यांनी धरला या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राणादांपत्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवले. मात्र त्यांनी 'या गुन्ह्यातून त्यांना दोष मुक्त करावे' असा अर्ज केला आहे. आज या संदर्भात दोष मुक्तते बाबत सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा हजर नसल्याने आमदार रवी राणा यांना सवाल करत दोन्ही आरोपीनी नियमितपणे हजर राहणे अनिवार्य आहे.असे स्पष्ट करत त्यांच्यावर ताशेरे ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.

या आधिही उपस्थित राहण्याचे निर्देश : मागील वेळी रवी राणा यांनी अटक वारंट टाळण्यासाठी हजेरी लावली होती.अन्यथा अटकेची टांगती तलवार होतीच. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले खासदार नवनीत राणा कुठे आहेत? त्यावर पती रवी राणा उत्तरले, त्या लोक सेवक आहेत जनतेच्या अत्यावश्यक कामाच्यासाठी त्या गैर हजर आहेत. त्यांना त्या बाबत सूट मिळावी, असा विनंती अर्ज दाखल केला आहे..यावेळी कोर्टाने संताप व्यक्त करत ताशेरे ओढले; न्यायालयात नियमितपणे हजेरी का लावत नाहीत.नियमानुसार हजर राहणे आवश्यक आहे.असे स्पष्ट केले होते

आ. राणा हजर पणा खा. गैरहजर : 15 दिवसांपूर्वी या पुर्वीच्या सुनावणीस नवनित राणा हजर होत्या. मात्र त्यांना उशिर झाला होता. या बाबत त्यांना न्य़ायालयाने चांगलेच सुनावले होते. आणि "पुढच्या वेळेला वेळेत हजर व्हा " असे निर्देश दिले होते. त्यावेळी तसेच दुसरे आरोपी रवी राणा उपस्थित नव्हते त्यांच्या बाबतचा प्रश्न देखील न्यायालयाने आरोपींना केला होता. याची जाणीव ठेवत आज मात्र वेळेत आमदार रवी राणा हजर राहिले.

सात्यताने गैरहजर : हनुमान चालीसा प्रकरणात कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्या प्रकरणात नवनीत राणा या आरोपी आहेत. सातत्याने कोर्टात राणादांपत्य सुनावणीसाठी हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस म्हटले होते की 19 जून रोजी व्यक्तिशः जर राणादांपत्य कोर्टात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या नावे वॉरंट काढावे लागेल. त्यामुळे आज ते कोर्टात हजर राहिले. त्यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणा याना गैर हजर राहण्यासाठी परवाणगी मागणारा अर्ज दाखल केला. त्यामुळे खात्यांचे वारंट टळले होते.

चूकीचा एफआयआर केल्याची तक्रार : राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयात अर्ज केला आहे की, त्यांना या आरोपामधून दोष मुक्ती मिळावी. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत; असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्यांच्यावर चुकीचा एफआयआर दाखल केलेला आहे. त्यामुळे हा एफआयआर रद्द करा असे देखील त्यांचे म्हणणें होते.मात्र पोलिसांनी नवनीत राणा यांचा दावा हा मागच्या वेळीच प्रतिज्ञा पत्रा आधारे फेटाळून लावला होता.

हजर राहण्याची लेखी हमी : मात्र उपलब्ध पुरावे आणि दस्तावेज पाहता राणादांपत्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे न्यायालयाने उलट पक्षी राणा दांपत्यांनाच तुम्ही हजर राहत नाही आणि विसंगत विधाने करतात याबाबत फटकारले होते. कोर्टाने फटकारल्यानंतर उपस्थित राहण्याची राणादांपत्याने लेखी हमी दिली आहे.म्हणून दोघाना सक्तीने न्यायालयात हजर राहणे अपरिहार्य 10 ऑगस्ट रोजी हजर होणे सक्तीचे आहे.

हेही वाचा :

  1. Portfolio Allocation : खाते वाटपाचा तिढा सुटला! कही खुशी, तर कही गम ; कोणाला मिळाले कोणते खाते, जाणून घ्या
  2. SC Notice To Assembly Speaker : सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही - नार्वेकर
  3. Summons Against Thackeray And Raut : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना 'या प्रकरणी' 31 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.