ETV Bharat / state

उन्नाव बलात्कार प्रकरण : अपघात की घातपात? लवकरच सत्य बाहेर येईल - राम नाईक - ट्रक

जे आरोप झाले आहेत, त्याची पूर्णतः चौकशी सीबीआयने करावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असल्याचे नाईक यांनी सांगितले.

उन्नाव बलात्कार प्रकरण : अपघात की घातपात? लवकरच सत्य बाहेर येईल - राम नाईक
author img

By

Published : Jul 30, 2019, 4:42 PM IST

मुंबई - उन्नाव येथील प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केला. बलात्कारपीडित तरुणीच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. यामध्ये ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तरूणीसह वकील गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरण : अपघात की घातपात?

याबाबत बोलताना राम नाईक म्हणाले की, जे आरोप झाले आहेत, त्याची पूर्णतः चौकशी सीबीआयने करावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे वक्तव्य नाईक यांनी केले आहे. मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यलयात नाईक बोलत होते.

या घटनेमुळे उत्तरप्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेत बदल झाले आहेत, असे मत मांडणे योग्य नाही. 5 वर्षांपूर्वी असलेला उत्तरप्रदेश बदलला आहे. कायदा सुधारला आहे. संघटित गुन्हे कमी झाले आहेत, वैयक्तिक गुन्हे कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

नाईक यांनी नव्याने भाजपचे सदस्यत्व पद घेतले आहे. राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी घटनेप्रमाणे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता राज्यपाल पदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये सदस्यपद देण्यात आले आहे.

काय आहे उन्नाव अपघात प्रकरण-

भाजप आमदार कुलदीप सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या कारला रविवारी अपघात झाला. ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, तिच्यासह वकील गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Intro:मुंबई |

उन्नाव येथील प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केला.
बलात्कारपीडित तरुणीच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तिच्यासह वकील गंभीर जखमी झाला आहे. हा घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत बोलताना राम नाईक म्हणाले की, "जे आरोप झालेला आहे. त्याची पूर्णतः चौकशी सीबीआयने करावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल'. नाईक हे मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यलयात बोलत होते.Body:या घटनेमुळे उत्तरप्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेत बदल झाले आहे, असं मत मांडणे योग्य नाही आहे. 5 वर्षांपूर्वी असलेला उत्तरप्रदेश बदलला आहे. कायदा सुधारला आहे. संघटित गुन्हे कमी झाले आहेत, वैयक्तिक गुन्हे कमी करण्याचा ही प्रयत्न सुरू आहे असेही नाईक यांनी सांगितले.

नाईक यांनी नव्याने भाजपचे सदस्यत्व पद घेतले आहे. राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी घटनेप्रमाणे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र आता राज्यपाल पदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणी मध्ये ही सदस्यपद देण्यात आले आहे

काय आहे उन्नाव अपघात प्रकरण

भाजप आमदार कुलदीप सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या कारला रविवारी अपघात झाला. ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, तिच्यासह वकील गंभीर जखमी झाले. हा घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.