ETV Bharat / state

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे

सुधारित नागरिकत्व कायदा सर्वधर्मसमभाव जपनारा नसून तो समजात तेढ निर्माण करणारा आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे या गदारोळात राज्यातील काही ठिकाणी उपरोक्त कायद्यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

mumbai
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे
author img

By

Published : Dec 26, 2019, 6:14 AM IST

मुंबई- देशात नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर विरोधात ठिकठिकाणी नागरिकांकडून विरोध केला जात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा सर्वधर्मसमभाव जपनारा नसून तो समजात तेढ निर्माण करणारा आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे या गदारोळात राज्यातील काही ठिकाणी उपरोक्त कायद्यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या मोर्चांचे दृश्य

गोंदिया- नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टरवरून देशभरात वातावरण पेटल्याचे पहायला मिळत आहे. गोंदियातही या कायद्यांविरोधात मुस्लिम समाजाने रैली काढत निषेध दर्शवला होता. मात्र, काल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर या बिलांच्या समर्थनात रॅली काढली. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही भव्य रैली संपूर्ण शहरभर फिरली. उपरोक्त बिल देशाला फायदेशीर असल्याचे या रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात आले. शहरातील आंबेडकर चौक येथे रैलीचे समापन करण्यात आले.

बुलडाणा- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील राष्ट्रीय एकता मंच खामगावच्या वतीने काल शहरातून विराट एकता मोर्चा काढण्यात आला. सर्वप्रथम स्थानिक शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सामुहिक राष्ट्रगीत होऊन मोर्चाला सुरूवात झाली. भारत माता की जय, हम सब एक है, अशा घोषणा देत हा मोर्चा भुसावळ चौक, सरकी लाईन, टॉवर चौक मार्गे निघून एसडीओ कार्यालयासमोर पोहचला. येथे काही मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांना माहिती देत या मोर्चामागची भूमिका विषद केली. त्यानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता करण्यात आली.

यवतमाळ- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ शहरात मोर्चा काढण्यात आला. पोस्टल मैदानापासून या मोर्चाची सुरूवात झाली होती. शहरात फिरल्यानंतर तिरंगा चौकात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. सदर कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. काँग्रेस मुस्लिम समाज आणि इतर समाजातील नागरिकांची दिशाभूल करत आहे, असा संदेश या मोर्चाचा माध्यमातून देण्यात आला.

नाशिक- नागरिकत्व सुधारणा कायद्या हा पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेशमधील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील देशाच्या फाळणीमुळे झालेला अन्याय दूर करणारा मानवतावादी कायदा आहे. केवळ मताच्या राजकारणासाठी या कायद्याबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात गदारोळ निर्माण झाला आहे. कायद्याच्या अमलबजावणीविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून विरोधकांकडून भाजप सरकारला घेरण्याच्या प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर सदर कायद्याबाबत भाजपकडून देशात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपाध्ये यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- ठाकरे सरकार ॲक्सिस बँकेला देणार धक्का.. पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याची मागणी

Intro:नागरिकत्व सुधारणा कायद्या हा पाकिस्तान, अफगाणिस्तान व बागलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांवरील देशाच्या फाळगीमुळे झालेला अन्याय दूर करणारा मानवतावादी कायदा असन, केवळ मताच्या राजकारणासाठी या कायद्याबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात .आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलायBody:भाजप कार्यालय वंसत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागरिकत्व सुधारणा
कायद्यावरून देशभरात गदारोळ निर्माण झाला आहे. या कायद्याच्या अमलबजावणीविरोधात लोक
रस्त्यावर येत असून, विरोगकाकडून भाजप सरकारला घरण्याच्या प्रयत्न होत आहे. या पाश्र्वभूमीवर या
कावद्याबाबत भाजपकड़न देशात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून
उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपची भूमिका मांडली. ते म्हणाले की. देशाची फाळणी धमांच्या आधारे झाली, हे कडवट सत्य आहे. त्यामुळे अल्पारख्याकांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक
आणावे लागले. हा कायदा नविन नसून १९५५ कायद्यातील सुधारणा आहे. देशाची फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानमध्ये २३ टक्के अपसंख्याक होते. मात्र आता ती
संख्या थवा दोन टकण्यावर आली आहे. बांगलादेशमध्ये २२ टक्के अल्पसंख्याक होते आता ती संख्या दहा ते बारा टक्क्यांपर्यंत आली आहे.. पाकिस्तान, बांगलादेशात
हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी,Conclusion:खिश्चन हे अल्पसंख्याक आहेत या
अल्पसंख्याकांना संरक्षणनपर
नागरिकत्व सुधारक विधेयक आणले
गले परतु विरोधकाकडूनला हा कायद्या मस्लिमविरोधी असल्याचा, तसेच त्याचे नागरिकत्व हिरावुन घेणार,
मतदानाचा अधिकार कापणार
असा गैरसमज पसरविला जात
आले. त्या मागे मतपेटीचे राजकारण
करण्याचे काम कांग्रेस व अन्य
विरोधी पक्षाकडून केले जात आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान व
बांगलादेश मधील हिंदू, जैन, बौद्ध,
शीख, पारशी, खिश्चन धर्मातील
जे लोक डिसेंबर २०१४ पूर्वी
भारतात आले त्यांना नागरिकाच
मिळणार आहे. यावेळी खा. डॉ.
भारती पवार, आ.राहुल
ढिकले. भाजपचे प्रदेश चिटणीस
लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश
पालवे उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.