मुंबई : राखी सावंत आणि शर्लिन चोप्रातील सुरूअसलेला वाद आणखी चिघळला ( Rakhi Sawant Sherlyn Chopra Controversy) आहे. शर्लिन ने राखी सावंत विरोधात अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली ( Sherlyn insulting comments against Rakhi Sawant) आहे. शर्लिनने यापूर्वी चित्रपट निर्माता साजिद खान विरुद्ध #MeToo तक्रार पोलिसांत दाखल केली होती. तिने अलीकडेच साजिद आणि राज कुंद्राच्या समर्थनार्थ समोर आल्याबद्दल राखीशी शब्दीक वाद सुरू केला .
राखी सावंतची प्रसारमाध्यमांसमोर नक्कल : काही दिवसांपूर्वी शर्लिनने राखी सावंतची प्रसारमाध्यमांसमोर नक्कल करून खिल्ली उडवली होती. तिच्यावर अनेक वैयक्तिक आरोपही केले होते. त्यावर शनिवारी, मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात ( Oshiwara Police Station ) शर्लिनवर राखीने वकिलांच्या मदतीने तक्रार दाखल केली. त्यानंतर मीडियाशी संवाद ( Filed complaint in Oshiwara Police Station ) साधला. यात तिने सांगितले की, शर्लिनच्या वक्तव्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे कारण तिच्या प्रियकराने तिची चौकशी सुरू केली आहे.
आयुष्यात गोंधळ निर्माण : "मला हे सांगताना खरंच वाईट वाटते की तिने माझ्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे माझ्या आयुष्यात गोंधळ निर्माण झाला आहे. तिच्यामुळे प्रियकराने मला 'शर्लिन जे काही बोलत आहे त्यात काही तथ्य आहे का', असा प्रश्न विचारला आहे. की खरच तुला 10 बॉयफ्रेंड्स आहेत. ती नुकतीच मीडियामध्ये आली आणि तिला जे काही हवे ते बोलून गेली. आता मला त्याची किंमत मोजावी लागतेय" असे राखी सावंत म्हणाली. राखी आणि तिच्या वकिलाने सांगितले की त्यांनी शर्लिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.