ETV Bharat / state

कोरोनामुक्त नागरिकांनी प्लाझ्मादान करावे; राजेश टोपे यांचे आवाहन

राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मादान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. प्लाझ्मादान करण्यामध्येही महाराष्ट्र देशात अग्रेसर असला पाहिजे. कोरोना विरुद्धच्या लढाईत रक्तदानाइतकेच प्लाझ्मादान श्रेष्ठ असल्याचे टोपे यांनी सांगितले.

rajesh tope
राजेश टोपे
author img

By

Published : Sep 7, 2020, 4:28 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात रक्तदानाइतकेच प्लाझ्मादान श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही आणि त्यातून गरजूंचे जीव नक्की वाचू शकतो. महाराष्ट्रामध्ये कोरोनातून बरे झालेले ५ लाख लोक आहेत, त्यातील प्लाझ्मादानासाठी बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मादानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

हेही वाचा-सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात

प्लाझ्माचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू असून त्यामध्ये यश मिळत असल्याचे आरोग्यमंंत्र्यांनी सांगतिले आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले, असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर, जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा असतो. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात, त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. त्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात, असे टोपे यांनी सांगितले.

प्लाझ्मा कोण देऊ शकतो?

जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील आणि हिमोग्लोबिन (HB) १२.५ टक्के असेल. वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंडविकार, हृदयविकार नसतील, अशा लोकांना प्लाझ्मादान करता येते. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत, त्यांना प्लाझ्मादान करता येतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो. त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने प्रमाण असेल तर, तो प्लाझ्मा पात्र असतो. एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रन्सफ्युजन कौन्सिल) या संकेतस्थळावर भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला प्लाझ्मा हवाय, अशांची नोंद करता येते, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

प्लाझ्मा दानासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा देणे हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो. कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

राज्य शासन, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब असे आपण एकत्र येऊन मॉडेल तयार करता येईल. तुमची भूमिका प्रोत्साहन देण्याची आहे. एक चांगली व्यवस्था निर्माण करूया. जे देणारे आहेत आणि जे घेणारे आहेत अशा दोघांनाही तुम्ही संपर्क करून आमच्याकडे सुपूर्द करा. प्लाझ्मादानामध्येही महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल. भारतीय जैन संघटनेचे यामध्ये योगदान असावे, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

सिरो सर्व्हेलन्सबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री यांनी सांगितले, एखाद्या समूहामध्ये किती संसर्ग झाला आहे याचं प्रमाण समजून येण्यासाठी केलेला अभ्यास आहे. धारावीमध्ये १०० पैकी ५६ लोकांमध्ये आयजीजी अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढाच आहे की प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची सुरुवात झाली. सिरो सर्व्हेलन्स मुंबई, पुणे, मालेगाव आता औरंगाबादमध्ये काही प्रमाणात झाला. आणखी काही हॉटस्पॉटमध्ये करण्याचा मानस असल्याचे टोपे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.