मुंबई - मराठी सणाचा थाट अनुभवायचा असेल तर तुम्हाला गिरगावात यायलाच हवं. गिरगावात जशी रस्त्यावर मोठ्या उत्साहात वाजत गाजत पारंपरिक वेशभूषा करून शोभायात्रा काढली जाते तसंच घराघरात हा सण आनंदात साजरा केला जातो. गिरगावातील राजपुरकर कुटुंब गेली ९ वर्ष प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहे.
घरात गुढी उभारल्यानंतर सासू, सासरे, मुलगा आणि सून खास पोशाख परिधान करून शोभायात्रेला अभिवादन करतात. गिरगावातील मराठी संस्कृती लोप पावत चालल्याची ओरड होत असताना त्यांची सण साजरा करायची पद्धत इतरांसाठी चर्चेचा विषय ठरते. त्यांच्याशी याबाबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी.