ETV Bharat / state

Rajan salvi : ठाकरे गटाला दणका ! आज राजन साळवी चौकशीसाठी एसीबी कार्यालयात राहणार हजर - ठाकरे गटाला दणक

ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. राजन साळवी (Rajan salvi ) यांची मुंबईतील वरळी येथे असलेल्या एसीबी कार्यालयात चौकशी आज करण्यात येणार आहे. त्यामुळे साळवी आज एसीबी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

Rajan salvi
राजन साळवी
author img

By

Published : Dec 5, 2022, 10:04 AM IST

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik of Thackeray group) यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने चौकशीची नोटीस काढल्याचं प्रकरण ताजे असतानाच आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीकडून चौकशी करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. आज राजन साळवी यांची मुंबईतील वरळी येथे असलेल्या एसीबी कार्यालयात चौकशी आज करण्यात येणार आहे. त्यामुळे साळवी आज एसीबी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. राजन साळवी यांनी माझे वकील मुंबई एसीबी कार्यालयात हजर राहतील अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

साळवी यांना टार्गेट करण्याचा डाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांना एसीबीकडून नोटीस मिळाल्यान राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राजन साळवी यांना टार्गेट करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच राजकीय फोडाफोडीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली असा आरोप साळवी यांनी केला आहे. या नोटीसनुसार साळवींना आज एसीबी चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे.

मालमत्तेसंदर्भात चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणामध्ये अडकविण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरु केलेला आहे. यापूर्वी अनिल परब, वैभव नाईक, किशोरी पेडणेकर यांनाही अशाच चौकशांना सामोरे जावे लागले आहे. आता राजन साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बजावण्यात आलेले आहे. साळवी यांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीतून नेमके काय साध्य होणार आहे हे चौकशी अंती समजणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.