ETV Bharat / state

ईव्हीएमवर मुख्यमंत्र्यांनाही आत्मचिंतन करावं, नाव न घेता राज ठाकरेंचा पलटवार - राज ठाकरे

ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देणाऱ्यांना मोठा आत्मचिंतन करावे लागणार आहे,असा पलटवार राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता केला आहे.

राज ठाकरें
author img

By

Published : Aug 2, 2019, 2:52 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रे दरम्यान विरोधकांवरही तोंडसुख घेतले होते. काही पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यात कोणी राहायला तयार नाही. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी त्यांनी आत्मचिंतन केले तर बर होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे विरोधकांवर केली होती. त्यावर उत्तर देताना आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, ईव्हीएमवर निवडून येणाऱ्यांनी असे बोलणे उचित नाही. ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देणाऱ्यांना मोठे आत्मचिंतन करावे लागणार आहे, असा पलटवार राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता केला आहे.

आम्ही ईव्हीएमला विरोध करण्याआधी 2014 पूर्वी भाजपने ईव्हीएम मशीनला विरोध केला होता. तेच यापूर्वी न्यायालयात गेले होते. यामुळे आता ईव्हीएममुळे निवडून आल्यानंतर भाजपने ईव्हीएमला पाठींबा दिला आहे. भाजपला त्यांच्या मतदारांवर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशीन सोडून बॅलेट पेपरवर मतदान घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानंतरही भाजप निवडून आल्यास आम्हाला त्याची काही हरकत नसेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणूक होण्यापूर्वीच सत्ताधारी किती जागा जिंकून येणार हे आकडे पहिले समोर ठेवतात आणि तेवढ्याच जागा निवडून येतात. यामुळे एकूणच निवडणूक आयोग व सरकारवर आमचा विश्वास नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

Intro:मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही तोंडसुख घेतले. काही पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यात कोणी राहायला तयार नाही. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी त्यांनी आत्मचिंतन केले तर बरं होईल अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे विरोधकांवर केली. ईव्हीएम वर निवडून येणाऱ्यांनी असं बोलणं उचित नाही. ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास भाजपला व आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देणाऱ्यांना मोठा आत्मचिंतन करावं लागणार आहे, असा पलटवार राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता केला आहे.Body:आम्ही ईव्हीएमला विरोध करण्याआधी 2014 पूर्वी भाजपने ईव्हीएम मशीनला विरोध केला होता, तेच यापूर्वी न्यायालयात गेले होते. यामुळे आता ईव्हीएम मुळे निवडून आल्यानंतर भाजपने ईव्हीएमला पाठींबा दिला आहे. भाजपला त्यांच्या मतदारांवर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशीन सोडून बॅलेट पेपरवर मतदान घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे असे राज ठाकरे यांनी म्हटले.
निवडणुक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक घेण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानंतरही भाजप निवडून आल्यास आम्हाला त्याची काही हरकत नसेल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.Conclusion:निवडणूक होण्यापूर्वीच सत्ताधारी किती जागा जिंकून येणार हे आकडे पहिले समोर ठेवतात आणि तेवढ्याच जागा निवडून येतात. यामुळे एकूणच निवडणूक आयोग व सरकारवर आमचा विश्वास नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.