ETV Bharat / state

Raj Thackeray Rally In Mulund मनसेच्या घे भरारी अभियानाची पहिली सभा होणार मुलुंडला, राज ठाकरे करणार मार्गदर्शन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

ठाकरे गटाच्या वतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. त्यापाठोपाठ भाजपनेही जागर मुंबईचा नावाने प्रचार सुरू केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घे भरारी अभियान ( Raj Thackeray Rally In Mulund ) सुरू करण्यात येणार आहे. या अभियानातील पहिली सभा ( MNS Ghe Bharari Campaign ) सहा जानेवारीला मुलुंडला होणार आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) हे मार्गदर्शन करणार आहेत.

Raj Thackeray Rally In Mulund
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Jan 3, 2023, 4:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Rally In Mulund ) यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर घे भरारी अभियान ( MNS Ghe Bharari Campaign ) राबवणार आहे. याअंतर्गत मनसेचे नेते प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा, बैठका घेणार आहेत. आता या अभियानाच्या पहिल्या सभेची तारीख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Maharashtra Navnirman Sena Campaign ) जाहीर करण्यात आली आहे. या अभियानाची पहिली सभा 6 जानेवारीला मुंबईतील मुलुंड येथे होणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत घे भरारी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घ्यायच्या आहेत. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. लोकांच्या मुलभूत समस्यांबाबत जनजागृती आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी घे भरारी अभियान राबविण्यात येणार असल्याची मनसेतील सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना, भाजपच्या यात्रांना मनसेचे उत्तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेवर ( Uddhav Thackeray Faction Mahaprabodhan Yatra ) विरोधक जोरदार टीका करत आहेत. यासोबतच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही जागर मुंबईचा हा प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी मनसेकडून ही मोहीम राबवली जात असल्याची चर्चा आहे.

आगामी निवडणुकीसाठी काम करण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत. राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा करून येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पक्षात येण्यासोबतच आगामी निवडणुकीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. आता घे भरारी मोहिमेच्या माध्यमातून सभा, मेळावे घेऊन मनसे जनतेला पर्याय देणार आहे. त्यामुळे या प्रयत्नात मनसे यशस्वी होते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.