ETV Bharat / state

होय हिंदूच..! पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलण्यासाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार - मनसे

गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये ते बोलत आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Jan 23, 2020, 7:29 PM IST

Updated : Jan 23, 2020, 8:04 PM IST

LIVE (राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे)

  • 7.51 pm - 9 फेब्रुवारी रोजी मनसेकडून आझाद मैदानावर बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मोर्चा काढणार
  • 7.50 pm - देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून बाहेर हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा.
  • 7.45 pm - झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझे मत तीच आहे जी पूर्वीपासून आहेत. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही.
  • 7.42 pm - समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावे लागेल.
  • 7.40 pm - धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही. तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही.
  • 7.37 pm - सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते.
  • 7.34 pm - जे देशाशी प्रामाणिक मुस्लीम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही.
  • 7.32 pm - झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालेच होते.

मुंबई - मी धर्मांतर केलेला नाही, मी मराठी आहे आणि मी हिंदूही आहे. मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर, मराठी म्हणून अंगावर जाईन. जर धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर, मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, असे राज ठाकरे म्हणाले.

आपल्यातलेच अनेक जण सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर या सगळ्या माध्यमांचा वापर करून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करू नये, तसे आढळल्यास त्याची पक्षातून हकालपट्टी होईल, असे इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे.

नविन झेंड्याबाबात बोलताना राज ठाकरे म्हणाले, पक्षाच्या स्थापनेच्या वेळी माझ्या मनात जो झेंडा होता तो झेंडा हाच आहे, ज्या झेंड्याचे अनावरण झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा पण भगवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारले होते. त्यामुळे राजमुद्रा हा झेंडा वापरणे काही चुकीचे नाही. हा झेंडा निवडणूकी वापरला जाणार नसून निवडणूकीवेळी मनसेचे निवडणूक चिन्हाच्याच झेंड्याचा वापर करा, असे राज ठाकरे म्हणाले.

गोरेगाव येथील राज्यव्यापी अधिवेशन सुरू असून येथून राज ठाकरे संबोधित करत आहेत.

Intro:Body:

मुंबई -

गोरेगाव येथील राज्यव्यापी अधिवेशनातील भाषणाची सुरुवात राज यांनी हिंदू या विशेषणापासून केली

Conclusion:
Last Updated : Jan 23, 2020, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.