ETV Bharat / state

भारतात एकही रस्ता कलाकाराच्या नावाने नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत - ART

बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये कला प्रदर्शाने उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.

राज ठाकरे
author img

By

Published : Feb 19, 2019, 9:17 PM IST

मुंबई - भारतात एकही चौक, रस्ता कलाकाराच्या नावाने नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही ताशेरे ओढले. आताच्या सरकारला कलेतील काही कळत नाहीच. पण, पुढचे सरकारही औरंगजेबाचेच असेल असे ते म्हणाले.

राज ठाकरे व्हीडिओ

जहांगीर आर्ट गॅलरीत ऑल इंडियाच्या १२७ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे यावेळी उद्घाटन झाले. तसेच, सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या चित्र प्रदर्शनाच्या कॅटलॉगचेही प्रकाशन ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. सुहास बहुलकर यांना राज ठाकरे यांच्या हस्ते रुपधर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंनी आयोजकांना फटकारले. ते म्हणाले, की तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता. पण, पालिका राज्याकडे आणि राज्य केंद्राकडे जबाबदारीची टोलवाटोलवी करते.

ठाकरे म्हणाले, की कलेचे विश्व 2 लाखात निर्माण होणे शक्य नाही. सरकारकडे डोके आपटले, तरी काही होणार नाही. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री शाळेत चित्रकलेचा विषय नको असे म्हणतात. त्या सरकारकडे आपण कलेच्या मदतीसाठी जातो. भारतात एकही चौक, रस्ता कलाकारच्या नावाने होत नाही हे दुर्दैव असल्याची खंतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

कलेची जाण असणाऱ्यांकडून बॉम्बे आर्ट गॅलरीसाठी मदत घेऊ आणि कोट्यवधी रुपयांची मदत मिळवू. यावेळी ठाकरेंनी बॉम्बे सोसायटीचा उल्लेख मुंबई सोसायटी असा केला. शहराचे नाव बदलले संस्थेचे नावही बदलावे, अशी सूचना राज ठाकरेंनी आयोजकांना केली.

undefined

यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार वासुदेव कामत, सोसायटीचे अध्यक्ष अनिल नाईक, सुप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजीत यादव,कलाकार सुहास बहुलकर उपस्थित होते. यावेळी पूलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना देखील आदरांजली वाहण्यात आली.

राजकीय भाष्य टाळले
ठाकरे म्हणाले, की बॉम्बे आर्ट गॅलरी ही कलाकारांची वास्तू आहे. यात मी राजकारण आणू इच्छित नाही. आपल्याला जे बोलायचे ते नंतर बोलू , असे म्हणून त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

Intro:आताच सरकार पुढचंही औरंगजेबाच असेल - राज ठाकरे
मुंबई - आताच्या सरकारला कलेतील काही कळत नाही, पुढचं सरकार ही औरंगजेबाच सरकार असेल. पालिका राज्यात व राज्य केंद्रात एकमेकांकडे भिरकावतात, यामुळे सरकारकडून मदतीची अपेक्षा करता असे राज ठाकरेंनी आयोजकांना फटकारले. सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांचा राज ठाकरे यांच्याहस्ते रूपधर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच सुहास बहुलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व बॉम्बे आर्ट सोसायटीच्या चित्र प्रदर्शनाच्या कटलॉगचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. Body:जहांगीर आर्ट गलरीत ऑल इंडियाच्या 127 व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. बॉम्बे आर्ट गॅलरी ही कलाकारांची वास्तू आहे, यात मी राजकारण आणू इच्छित नाही.आपल्याला जे बोलायचं ते नंतर बोलू असे राज ठाकरेंनी माध्यमाना म्हटले.
कलेचं विश्व 2 लाखांत निर्माण होणे शक्य नाही,
सरकार कडे डोके आपटले तरी काही होणार नाही. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री शाळेत चित्रकलेचा विषय नको असे म्हणतात त्या राज्य सरकारकडे आपण कलेच्या मदतीसाठी जातो.
भारतात एकही चौक,रस्ता कलाकारच्या नावाने होत नाही हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.Conclusion:कलेची जाण असणाऱ्यांकडून बॉम्बे आर्ट गॅलरीसाठी मदत घेऊ आणि कोट्यवधी रुपयांची मदत मिळवू. बॉम्बे आर्ट सोसायटीला मुद्दाम मुंबई म्हणतो, शहराचं नाव बदललं संस्थेचे नाव ही बदलावे अशी सूचना राज ठाकरेंनी आयोजकांना केली.
यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार वासुदेव कामत, सोसायटीचे अध्यक्ष अनिल नाईक, सुप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव,कलाकार सुहास बहुलकर उपस्थित होते.पूलवामाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना देखील यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.