ETV Bharat / state

मुंबईत पावसाची काही काळ विश्रांती - मुंबई पाऊस लेटेस्ट न्यूज

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सध्या मुंबईत काही प्रमाणात पाऊस थांबला असला तरी वाऱ्यांचा जोर कायम आहे.

Mumbai Rain
मुंबई पाऊस
author img

By

Published : Aug 6, 2020, 5:03 PM IST

मुंबई - शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने काही काळ लोकल अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवान अद्याप मदतकार्यात गुंतले आहे.

मुंबईत पावसाची काही काळ विश्रांती

मुंबईतील पावसाचे 46 वर्षांचे रेकॉर्ड तुटले -

यावर्षी मुंबईत झालेल्या पावसाने मागील 46 वर्षांचा विक्रम मोडला. ऑगस्ट 1974मध्ये कुलाबा वेधशाळेत सर्वाधिक 262 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. काल मुंबईत 294 मीमी पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सध्या मुंबईत काही प्रमाणात पाऊस थांबला असला तरी वाऱ्यांचा जोर कायम आहे. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळणे सुरूच आहे. साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रात भरतीची वेळ असल्याने आणि पुन्हा पाऊस पडल्यास शहरात पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.