ETV Bharat / state

कौतुकास्पद..! पीडितांच्या घरी जाऊन रेल्वे पोलिसांनी परत केला चोरीला गेलेला मुद्देमाल - मुंबई पोलीस बातमी

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान चोरीला गेलेला मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन त्यांचा चोरीला परत केला आहे. तब्बल 2 कोटी 13 लाख 53 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी परत दिला आहे.

ऐवज परत करताना पोलीस
ऐवज परत करताना पोलीस
author img

By

Published : Sep 29, 2020, 3:54 PM IST

Updated : Sep 29, 2020, 5:27 PM IST

मुंबई - मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत प्रवाशांचा मोबाईल फोन, अंगावरील दागिने, लॅपटॉप व पाकिट हे दरदिवशी चोरीला जातात. यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करत 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. मात्र, कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना घरा बाहेर पडता येत नसल्यामुळे स्वतः रेल्वे पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात संबंधित पीडित रेल्वे प्रवाशांना त्यांचा मुद्देमाल स्वतः त्यांच्या घरी जाऊन परत केला आहे. जून 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात रेल्वे पोलिसांकडून 14 हजार 566 प्रकरणातील तब्ब्ल 2 कोटी 13 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल पीडित प्रवाशांना परत केला आहे.

पीडितांच्या घरी जाऊन रेल्वे पोलिसांनी परत केला चोरीला गेलेला मुद्देमाल
26 वर्षांहून अधिक जुन्या गुन्ह्याचा केला गेला तपास

बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार क्लाइव्ह डिसोजा यांची 26 वर्षांपूर्वी 5 ग्राम सोन्याची साखळी परत मिळवून देण्यात आली आहे. तर, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वर्षांपूर्वी तक्रारदार रमेश पटेल यांची 2 हजार 20 नग कच्चे हिरे चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 19 वर्षानंतर पुन्हा ते मिळवून दिले आहेत.

सप्टेंबर 2019 मधील कारवाई

रेल्वे पोलिसांकडून सप्टेंबर 2019दरम्यान 81 लाख 60 हजारांचा चोरी करण्यात आलेला मुद्देमाल प्रवाशांना परत करण्यात आलेला असून यात 1 किलो 180 ग्रॅम सोन्याचे दागिने व 6 लॅपटॉप परत करण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांनी या काळात तब्बल 46 लाख 57 हजारांची रोख रक्कम पीडित प्रवाशांना पुन्हा मिळवून दिली आहे.

जानेवारी 2020 मधील कारवाई

1 कोटी 5 लाखांचा चोरीला गेलेला मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या घरी जाऊन स्वतः परत केला असून यात 2 किलो 282 ग्राम सोन्याचे दागिने, 5 लॅपटॉप व 1 लाखांची रोख रक्कम परत करण्यात आली आहे.

जून 2020 ते सप्टेंबर 2020 मधील कारवाई

यात 757 ग्रॅम चोरी करण्यात आलेले सोन्याचे दागिने, 6 लॅपटॉप , 1 हजार 68 मोबाईल फोन जून ते सप्टेंबर 2020 या दरम्यान परत करण्यात आलेले आहेत.

रेल्वे पोलिसांकडून टाळेबंदीत पीडित प्रवाशांना परत करण्यात आलेल्या मुद्देमाल घरपोच दिल्याने तक्रारदारांना सुखद धक्का अनुभवयाला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून बऱ्याच नागरिकांचा पोलिसांबद्दल असलेला दुराग्रह, गैरसमज दूर होत असून व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर संबंधित प्रवासी हे रेल्वे पोलिसांचे आभार मानत आहे. सध्या मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एकूण पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2020अखेर 4 हाजर 18 मुद्देमाल शिल्लक असून तो लवकरात लवकर पीडितांना परत करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सेनगावकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी नियोजन करा - उच्च न्यायालय

Last Updated : Sep 29, 2020, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.