मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि सर्वच शासन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेताना दिसत आहे. राज्यातील शाळा तसेच गर्दी होऊ नये हे ठिकाण बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे सुरूच आहे. त्यामुळे रेल्वेत या रोगाचे संक्रमण होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानक रेल्वे किटकनाशक फवारणी करत स्वच्छ साफ करताना दिसत आहेत.
मुंबईचा रेल्वेने जवळ-जवळ 75 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेत प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून रेल्वे प्रशासनाकडून रोज रेल्वे हे साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच रेल्वेतील घाषणेद्वारे या रोगाविषयी जनजागृती करताना दिसत आहे. तसेच लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, याबद्दल रेल्वेत घोषणा केल्या जात आहेत.
रेल्वेतील तिन्ही मार्गांवर असणाऱ्या रेल्वेमध्ये ही स्वच्छ साफ सफाई करण्यात येत आहे. कोरोना हा रोग संसर्गजन्य आहे. त्यामुळे याची दक्षता घेत आम्ही लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जागरूते विषयी आवाहन करत आहोत. तसेच कीटकनाशके फवारणी करत, कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी लोकांना जागृत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद