मुंबई - ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला व स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
-
Students appearing for final exams and other competitive exams for advance studies, please see 👇 pic.twitter.com/hDRhFz1WPd
— Central Railway (@Central_Railway) September 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Students appearing for final exams and other competitive exams for advance studies, please see 👇 pic.twitter.com/hDRhFz1WPd
— Central Railway (@Central_Railway) September 12, 2020Students appearing for final exams and other competitive exams for advance studies, please see 👇 pic.twitter.com/hDRhFz1WPd
— Central Railway (@Central_Railway) September 12, 2020
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी प्रवेशपत्र दाखवावे लागणार आहे. स्टेशनवरचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांना विद्यार्थ्यांना प्रवासासाठी परवानगी देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- 'एनसीबी'चे मुंबईत छापे; मात्र कुणालाही अटक नाही
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या स्टेशनवर जास्तीचे तिकीट काऊंटर उघडण्यात येणार आहेत. तसेच परीक्षेच्या दिवशी जादा लोकल देखील सोडण्यात येणार आहेत. इतर कोणीही प्रवासासाठी स्टेशनवर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे. प्रवास करताना वैद्यकीय सूचना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गरजेची सगळी माहिती रेल्वेकडून देण्यात येईल, असेही रेल्वेने सांगितले आहे.