मुंबई Rahul Narvekar : दिवाळीनिमित्त मुंबईच्या कुलाबा, कोळीवाडा मतदारसंघात आज स्थानिक गोरगरीब जनतेबरोबर दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसंच कौशल्य विकास मंत्री, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवाळी फटाक्यांबरोबर राजकीय फटाक्यांवरही भाष्य केलं आहे.
राजकीय फटाके सातत्यानं फुटत असतात : यावेळी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "राजकीय फटाके आपण नेहमीच फोडतो, मात्र आज दिवाळी असल्यानं केवळ दिवाळीच्या फटाक्यांवरचं बोलणं योग्य ठरेल. याचं कारण राजकीय फटाके फोडायला अजून वेळ आहे", असं सांगून त्यांनी राजकीय घडामोडींच्या गोंधळात आणखी भर टाकली. शिवसेनेच्या अपात्र आमदाराबाबत 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. याबाबत नार्वेकर यांना विचारलं असता, "तुम्ही काळजी करू नका, राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे", असं ते म्हणाले.
अत्यंत शाश्वत आणि टिकाऊ निर्णय : मराठा नेते जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला निर्णय लोकशाहीतही होणं अपेक्षित आहे. परंतु असे निर्णय घेताना ते निर्णय घटनात्मक, लोकशाही पद्धतीनं होणं अपेक्षित आहे. मग असे निर्णय घेताना ते निर्णय शाश्वत कसे असतील? हा निर्णय कसा टिकेल, याचा विचार करून निर्णय घेतला जाईल", अशी अपेक्षा आहे. मला खात्री आहे की, हे सरकार संवेदनशील आहे. विधिमंडळही या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे. आगामी काळात सरकारकडून अत्यंत शाश्वत निर्णय घेतला जाणार असून त्याला विधिमंडळाचा योग्य पाठिंबा मिळेल.
हेही वाचा -
- Diwali 2023 : राजकारणातील 'कारीट' नंतर फोडणार आज फक्त. . , अनिल परब यांनी सूचक इशारा देत दिल्या शुभेच्छा
- Fadnavis Appeal On Diwali: फटाके फोडा, दिवे लावा, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन
- Sanjay Raut News : '31 डिसेंबरनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार', मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा