ETV Bharat / state

Rahul Narvekar On Delhi Tour : दिल्ली दौऱ्याबाबत राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण, म्हणाले की... - राहुल नार्वेकर दिल्ली दौरा

Rahul Narvekar On Delhi Tour: चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राहुल नार्वेकर दिल्लीला जात असल्याच्या बातम्या झळकल्या. यानंतर नार्वेकर यांनी त्याबाबत स्पष्टीकरण (Rahul Narvekar Delhi tour) दिलं आहे की, दिल्ली दौरा हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. (Rahul Narvekar) अनेक कार्यक्रम आणि बैठका दिल्लीमध्ये असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचं नार्वेकर म्हणाले. (MLA disqualification issue)

Rahul Narvekar On Delhi Tour
राहुल नार्वेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 7:30 PM IST

मुंबई Rahul Narvekar On Delhi Tour : नार्वेकरांच्या स्पष्टीकरणापूर्वी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीत नार्वेकर कायदेतज्ञांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. (Rahul Narvekar Delhi tour) येत्या दोन दिवसात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार असल्याचेही बोलले जात होते. आता नार्वेकर यांनी आपला दौरा पूर्वनियोजत असल्याचं स्पष्ट केलं आहे. (MLA disqualification issue)

अनेक चर्चांना उधाण : राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारित टाकल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबताचा निर्णय लांबनीवर टाकत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या आरोपनंतर सर्वोच्च न्यायालयानेही विधानसभा अध्यक्षांना लवकरच निर्णय घेण्याबाबत सुनावले आहे. त्यातच अचानकपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सुनावणी लवकर घ्या-सर्वोच्च न्यायालय : सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातील सुनावणी लवकर घेऊन दोन आठवड्यात कारवाई बाबतची माहिती देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. मागील चार महिन्यात त्या संदर्भात कोणतीही कारवाई केली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने नार्वेकर कामाला लागले असून त्यानिमित्ताने दिल्लीला रवाना झाले असल्याचे बोलले जात आहे.

अभ्यासअंती निर्णय घ्यावा : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट म्हणाले की, आमची केस सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. आमची बाजू वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे मांडली आहे. नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही तर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घेतला आणि तो सर्वोच्च न्यायालयाने टाळला असे होता कामा नये. याची खबरदारी अध्यक्ष घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनचं कायदेशीर अभ्यासअंती निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी ते दिल्लीला गेले असतील असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.

नार्वेकरांकडे सगळ्यांचे लक्ष : राज्यातील सत्ता संघर्षावरील निर्णय लवकरच येणे अपेक्षित असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील दौऱ्यात अध्यक्ष नार्वेकर कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा:

  1. Bawankule On Narvekar : पडळकरांच्या वतीनं अजित पवारांची मी माफी मागतो, तर नार्वेकर कायद्याला धरूनच निकाल देतील - चंद्रशेखर बावनकुळे
  2. Udhaynidhi Stalin : 'आदिवासी आणि विधवा असल्यामुळंच राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हतं'
  3. Muslim Reservation : ...तर आमच्याकडंही 'जरांगे पाटील' आहेत; मुस्लिम आरक्षणावरून 'एमआयएम'आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.