ETV Bharat / state

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे अडचणीत येणार? शिंदे गटात सहभागी होताच राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार विरोधात शनिवारी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. शिवसेनेने हा मोर्चा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेले शक्तीप्रदर्शन करत सूचक संकेत दिले. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणाचा सविस्तर तपास करा, अशी मागणी देखील यावेळी केली गेली.

Shiv Sena Thackeray Group March
युवानेते आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jul 2, 2023, 12:01 PM IST

Updated : Jul 2, 2023, 12:36 PM IST

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. मात्र मुसळधार पाऊस असला तरी विराट मोर्चा निघेल, असे आवाहन ठाकरे गटाने केले होते. शनिवारी बरोबर साडेचार वाजता मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर हजारोंच्या संख्येने आलेल्या मोर्च्याचे सभेत रुपांतर झाले. विशेष म्हणजे सभेला सुरुवात झाली आणि तासभर पावसानेही उसंत घेतल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढला. युवानेते आदित्य ठाकरे हे मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने शिवसैनिकांनी पालिकेसमोर धडक दिली. त्यावेळी पालिकेसमोरील वातावरण अवघे भगवेमय झाले होते.

सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरण : सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान प्रकरणात भाजपाने राहुल कनाल यांचे नाव गोवल्यानंतर थेट शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात होते. राहुल कनाल यांनी यावर प्रत्युत्तर दिले. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. माझे नाव त्यात आल्यास राजकारण सोडेन, असा इशारा दिला.

ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील सत्ता गमावावी लागली. त्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक जोरदार धक्के बसत आहेत. 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे राहुल कनाल यांनी ठाकरे गट सोडून शिंदें गटाची कास धरली. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे कनाल म्हणाले. तसेच, माझे नाव त्यात असल्यास राजकारण सोडू, असा दावा केला.

राहुल कनालच्या घरावर छापा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आपल्या पक्षातील निर्णय काही लोकांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या सल्ल्याने घेतात, असा गंभीर आरोप कनाल यांनी केला. स्वाभिमान अशीही एक गोष्ट आहे, त्यामुळे ठाकरेंना सोडल्याचे कनाल म्हणाले. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या मित्र आणि निकटवर्तीय मानले जात होते. युवासेनेचे ते सक्रिय सदस्य होते. युवा सेनेच्या कोअर कमिटीतही होते, पण कोअर कमिटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, बाजूला झाले होते. मार्च 2022 मध्ये आयकर विभागाने राहुल कनाल यांच्या घरावर छापा टाकला होता. आदित्य ठाकरेंनी त्यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एवढेच नाही तर या मुद्द्यावरून त्यांनी भाजप नेते किरीट सोमैय्यांवर हल्लाबोल केला होता.

चित्रपटसृष्टीतील मित्रांची यादी : राहुल कानल यांची शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्रस्ट-श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2017 मध्ये ते बीएमसीच्या शिक्षण समितीचे सदस्यही होते. व्यवसायाने उद्योगपती असलेल्या कनाल यांची मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील मित्रांची यादी मोठी आहे. सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटींशी त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. याशिवाय तो क्रिकेटर विराट कोहलीचा खूप चांगला मित्र आहे.

हेही वाचा :

  1. Aaditya Thackeray : 'विरोधकांना ईडीची भीती; आम्ही जयंत पाटलांच्या पाठिशी उभे'
  2. Shrikant Shinde on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कंत्राटदाराची भाषा बोलणारे पुढारी; खासदार श्रीकांत शिंदेंची टीका
  3. Aaditya Thackeray on Barsu : सरकारची हुकूमशाही, लाठीकाठी मारून विकास होत नाही - आदित्य ठाकरे

Last Updated : Jul 2, 2023, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.