मुंबई - पंतप्रधान मोदी म्हणतात 70 वर्षात काही झाले नाही. मात्र, मोदींनी जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची मुंबईतील धारावी येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर निषाणा साधला.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचे मतदारांना साकडे; वरळी मतदारसंघातून काढली रॅली
यावेळी गांधी म्हणाले, पीएमसी बँकेचे संचालक कोणाचे नातेवाईक होते? आणि पैसे कोणाचे अडकले, यावर मोदींनी बोलावे, असे आव्हान गांधीनी मोदींना दिले. तसेच मंदीला आता तर सुरुवात झाली आहे. अजून 6 ते 7 महिन्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे भाकीत गांधीनी केले. इंग्रज ज्या प्रकारे लोकांना लुटत होते. त्याच प्रकारे हे सरकार गरिबांना लुटून उद्योगपतींना पैसे देत आहे. सर्व देशाला माहिती आहे, की राफेल विमान खरेदीत भरष्टाचार झाला आहे. या व्यवहारात पंतप्रधानांचा हस्तक्षेप होता, असा आरोपही गांधीनी केला.
हेही वाचा - मुंबईत राहुल गांधीच्या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी
मोदी म्हणतात 70 वर्षात काही झाल नाही. मात्र, मोदींनी जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही. धारावी देशाचा सिम्बल आहे. धारावीच चायनाचा मुकाबला करू शकते. या धारावीची जे इज्जत करत नाहीत, ते देशाला कधीच समजू शकत नाहीत, असे गांधी यावेळी म्हणाले.