मुंबई : ब्रिटिश कंपनी असलेली क्यूएस विद्यापीठ श्रेणी बाबत विशेष निरीक्षण करून निकष तयार केला होता. त्या निकषांमध्ये आयआयटी मुंबई यांनी विविध विषयांमध्ये सुधार केली आहे. तसेच कला व डिझाईनसाठी 51 ते 100 अशा पद्धतीने मानांकन मिळाले आहे. तर संगणक आणि माहिती तंत्रज्ञानासाठी 66 वे तर सिविल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी 51 ते 100 मानांकन आणि रशान शास्त्र अभियांत्रिकीसाठी 77 तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीसाठी 54 आणि मेकॅनिकल एरोनॉटिकलसाठी 68 नावे मानांकन देण्यात आले आहे.
इतके गुण प्राप्त: आयआयटी मुंबई जागतिक स्तरावर 47 व्या स्थानावर आहे. तर भारतात मात्र आयआयटी मुंबईचा क्रमांक पहिला आहे. 2023 च्या श्रेणी अहवालानुसार शंभर पैकी 80.4 गुण आयआयटीने मिळवले आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच निसर्ग विज्ञान आणि सामाजिक विज्ञान व व्यवस्थापन, कला यामध्ये भरी योगदान केले आहे. जवळजवळ आयआयटी मुंबईने मागच्या वर्षीच्या तुलनेत 18 अशा क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याचे देखील या जागतिक क्रमवारीमध्ये दिसून आले आहे. तसेच गणितात आणि खाणकाम संशोधनात सर्वोच्च कामगिरी आयआयटी मुंबईची आहे.
सर्वोच्च गुणदेखील प्राप्त: ब्रिटिश स्थित क्यूएस जागतिक मानांकन आणि श्रेणीबाबत अहवाल प्रसारित करणाऱ्या या संस्थेने, आयआयटी मुंबईची गणितामध्ये सर्वोच्च कामगिरी असल्याची नोंद केली आहे. आयआयटी मुंबईला गणित या विषयासाठी 78.6 गुण प्राप्त झालेले आहेत. तसेच अभियांत्रिकी खनिज आणि खाणकाम यामध्ये देखील 88.1 गुण मिळालेले आहेत. केवळ खनिज आणि खाणकाम यामधील अभियांत्रिकी संदर्भाचे संशोधन आहे. आयआयटीला 88.8 हे सर्वोच्च गुणदेखील प्राप्त केले आहे.
मोलाचे योगदान केले: ब्रिटिश संस्थेने क्यूएस जागतिक मानांकन श्रेणीबाबत जो अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये उच्च शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट ध्येय तिथले शिकवणारे प्राध्यापक, तिथले शैक्षणिक वातावरण विज्ञानामध्ये संशोधन मानव विकासासाठीच संशोधन, पर्यावरण मानवी की अशा विविध क्षेत्रांमध्ये काय काय कामगिरी केलेली आहे. याची नोंद केली जाते आणि त्या आधारावर जागतिक स्तरावर त्या त्या संस्थांची क्रमवारी ठरवली जाते. यासंदर्भातमुंबई आयआयटी संचालक सुभाष चौधरी म्हणाले की, भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये संस्थेने उत्कृष्ट भूमिका वठवली आहे. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी त्यामध्ये मोलाचे योगदान केले आहे. हे योगदान असेच सुरू राहिल. उच्च शिक्षणाची स्थिती आणखीन सुधारणे हा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी आणि प्राध्यापक आणि संशोधक या सगळ्यांनी जे एकजुटीने काम केले आहे. यासाठी सुभाष चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.