ETV Bharat / state

सब कंत्राटदार नियुक्त करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी - यशवंत जाधव

मिशिगन इंजिनियरिंग आणि आयटीडी सिमेंटेशन कंपनीने स्वत: काम न करता सब कंत्राटदार नियुक्त केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कंपन्यांची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.

मुंबई
put in blacklist the companies that hire subcontractor
author img

By

Published : Oct 16, 2020, 8:21 AM IST

मुंबई - विविध विकास कामांसाठी पालिका निविदा काढून कंत्राटदारांची नियुक्त्या करते. मात्र मिशिगन इंजिनियरिंग आणि आयटीडी सिमेंटेशन कंपनीने स्वत: काम न करता सब कंत्राटदार नियुक्त केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कंपन्यांची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.

मुंबईतील विकास कामासाठी काढण्यात आलेल्या एका निविदेमध्ये आयटीडी सिमेंटेशन या कंपनीने मिशिगन इंजिनियरिंगच्यावतीने निविदा मागवल्याचे म्हटले आहे. आयटीडीने अधिकृत २५ टक्के कामाचे सब कॉन्ट्रॅक्ट केले असे म्हटले आहे. पण या कंपनीने मिशिगन कंपनीसोबत २५ टक्क्यांपेक्षा जास्त सब कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी सक्षम लेखाधिकारी नेमण्यात यावा आणि आयटीडी व मिशिगन दरम्यानची सर्व खात्यांची पडताळणी करण्यासंदर्भात जीएसटी, आयटी, इओडब्लू आणि आरओसी इत्यादी कार्यलयांकडे अधिकृत लेखी पत्रव्यवहार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

ठेका एकाने घ्यायचा आणि दुसर्‍याने काम करायचे असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामांचा दर्जा घसरत चालला असल्याचे दाखवून देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आतापर्यंत वाटप झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.