ETV Bharat / state

Gangster Nilesh Ghaiwal : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर - Gangster Nilesh Ghaiwal

पुण्यातील कुख्यात गुंड ( Pune notorious gangster ) नीलेश घायवळ ( Nilesh Ghaiwal ) याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला ( Nilesh Ghaiwal granted bail by Bombay High Court )आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात ( Kothrud police station in Pune ) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gangster Nilesh Ghaiwal
Gangster Nilesh Ghaiwal
author img

By

Published : Dec 1, 2022, 9:40 PM IST

मुंबई - पुण्यातील कुख्यात गुंड ( Pune notorious gangster ) नीलेश घायवळ ( Nilesh Ghaiwal ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर ( Nilesh Ghaiwal granted bail by Bombay High Court )केला आहे. त्यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस ( Kothrud police station in Pune ) ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. घायवळ याला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश संदीप शिंदे यांनी हे आदेश दिले आहे.

नीलेश घायवळला जामीन मंजूर - पुण्यातील रॅलीसाठी गाडी पाहिजे असे म्हणत चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने जीप घेऊन गेल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला जामीन मंजूर झाला आहे. घायवळ याला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश संदीप शिंदे यांनी हे आदेश दिले आहे.

घायवळसह त्याच्या साथिदारांवर दरोड्याचा गुन्हा - याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नीलेश घायवळसह त्याच्या टोळीतील सदस्य संतोष धुमाळ, कुणाल कंधारे, मुसाब उर्फ मुसा इलाही शेख, अक्षय गोगावले, विपुल माझीरे, इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संतोष धुमाळ, मुसाब उर्फ मुसा इलाही शेख यांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. याबाबत राज चंद्रकांत कदम यांनी फिर्याद दिली होती. चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने रॅलीसाठी जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीतील आठ जणांवर खंडणीविरोधी पथकाने दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी नीलेश घायवळ याने जामिनासाठी अ‍ॅड. आबाद पोंडा व अ‍ॅड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

गुन्हा खोटा असल्याचा घायवळच्या वकिलांचा आरोप - नीलेश घायवळ याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे. तसेच गुन्हा घडल्यानंतर 15 ते 16 महिन्यांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा घडला त्यावेळी घायवळ हा तुरुंगात होता असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश संदीप शिंदे यांनी अटी, शर्तींवर नीलेश घायवळ याचा जामीन मंजूर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.