मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करताना नुकसान भरपाई न मिळाल्याने आज (दि. 26 डिसेंबर) अंधेरी येथील आरबीआय कंपनीच्या कार्यालयासमोर कामगारांनी कुटुंबीयांसह एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे. जर कंपनीने मागण्या मान्य न केल्यास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामगार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या आहेत मागण्या
- 15 वर्षे काम केलेल्या सर्व कामगारांना त्वरित नुकसान भरपाई द्या.
- ज्या कामगारांचे हिशोब काढताना चुकीच्या पद्धतीने काढले आहेत, त्या कामगारांचे पुन्हा हिशोब काढा.
- या मार्गावर पुन्हा एकदा आरआयबी कंपनीला टेंडर मिळाल्यास या सर्व कामगारांना मागील सेवा शर्तींसह कामावर हजर करून घ्या.
हेही वाचा - आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर