ETV Bharat / state

मंदिरे उघडली...! भक्तांसह धार्मिक संघटनांमध्ये उत्साह; पण मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड - मंदिरावरील उपजीविका मुंबई

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मंदिरे बंद होती. ती आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आली. मात्र, कोरोनाचा धोका टळला नसल्याने सरकारने मंदिर उघडण्यासाठी नियमावली जारी केली. त्याचा फटका मंदिरावर उपजीविका असणाऱ्या पूजा साहित्या विक्रेत्यांना बसला आहे.

मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड
मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड
author img

By

Published : Nov 16, 2020, 3:20 PM IST

Updated : Nov 16, 2020, 3:48 PM IST

मुंबई - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे, मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांची उपासमार झाली. मात्र दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तसाधत आजपासून राज्यातील सर्वच मंदिरे सुरू झाली आहेत. त्यामुळे मंदिरावर उपजीविका असणारे सर्व आनंदित झाले होते. मात्र मंदिरात भाविकांना साहित्य नेण्यास मनाई असल्याने मंदिराबाहेर वस्तू विक्री करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड

सरकारच्या गाई़़डलाईन ठरल्या नुकसान कारक-

मुंबईत दादर सिद्धिविनायक मंदिराबाहेर पूजेचे साहित्य. बेल-फुल विक्रेते हे गेल्या आठ महिन्यापासून मंदिर बंद असल्याने अडचणीत आले आहेत. त्यांनीदेखील आपआपल्यापरीने मंदिर प्रशासन तसेच सरकारदरबारी मंदिर उघडण्यासाठी वेळोवेळी मागणी केल्या. शनिवारी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्यापासून मंदिर उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंदिरावर आधारित असणारे व्यवसायिक आनंदित झाले. मात्र मंदिर उघडत असताना काही गाईडलाईन्स सरकारकडून देण्यात आल्या, त्यामध्ये मंदिरात फुल, मिठाई तसेच इतर पूजेचे साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराबाहेर पूजा साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे आता सरकारने ज्या प्रमाणे मंदिर सुरू करण्याची परवानगी दिली, तसेच आमचा देखील विचार करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड
मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड

सिद्धीविनायकाच्या मंदिराबाहेरील विक्रेत्यांतमध्ये नाराजी-

दादर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात देऊळ बंद असल्याने गणेशोत्सवात देखील भाविकांना बाप्पाचे दर्शन करता आले नाही. याचा मंदिरात येणाऱ्या भाविकांवर आधारीत व्यवसाय असणाऱ्या फुल, पेढे आणि इतर पूजेच्या वस्तू विक्रेत्यांवर परिणाम झाला. दुसऱ्या बाजूला मंदिराचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. कोट्यवधी रुपये देणगी स्वरुपात दानपेटीत जमा होतात. परंतु या काळात हे उत्पन्न काही लाखावर आले.

मंदिर कर्मचारी, सेवेकरी यांच्या पगारावर परिणाम-

मंदिराचे उत्पादन घटल्यामुळे मंदिराचे सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरदेखील परिणाम पडला. एकूणच गेल्या आठ महिन्यापासून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या घटकांचे अतोनात हाल झाले . त्यामुळे आता मंदिरात सुरू असतानाही आमचे हाल व्हायला नको म्हणून सरकारने आमचा विचार करत अशा गाईडलाईन बनवत परवानगी द्यावी अशी विनंती फुल विक्रेते व पेढे विक्रेते करत आहेत.

Last Updated : Nov 16, 2020, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.