ETV Bharat / state

दहा वर्षानंतर दिली दहावीची परीक्षा; घरकाम करणाऱ्या पुजाने मिळवला शाळेतून पहिला येण्याचा मान

पुजाने शिकण्यासाठी आई-वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला. घाटलागावात असलेल्या न्यु इरा शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर आईसारखेच दररोज दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे. पुन्हा घरी येऊन अभ्यास करायचा, असा तिचा नित्यक्रम सुरू झाला.

दहावीत बाजी मारणारी पुजा अहिरे
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:21 AM IST

Updated : Jun 10, 2019, 9:45 AM IST

मुंबई - दहा वर्षांपूर्वी दहावीचे शिक्षण पूर्ण करता न आलेल्या पुजा अहिरेने दोन मुले सांभाळत आणि दिवसभर अनेक ठिकाणचे घरकाम करून दहावीच्या परीक्षेत गरूड भरारी घेतली. तिने शाळेत पहिली येण्याचा मान मिळवला. परिस्थितीवर मात करत तिने दहावीत उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

पुजा वाशीनाका येथे असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर शाळेत २००८ मध्ये नववीत शिकत होती. मध्येच शिक्षण सुटले आणि अल्पवयातच तिला लग्नाला सामोरे जावे लागले. त्याच दोन मुले झाली. पुढे शिक्षणाचा मार्गच बंद झाला. पती, सासू यांचा विरोध होता. मात्र, मनात शिक्षणाची जिद्द कायम होती. हातावर पोट असतानाही पुजाला खूप शिकायचे होते. शिकून पोलिसात जायचे होते. त्यातूनच मार्ग मिळाला आणि तिने घरकाम करत आपल्या मुलांचा सांभाळ करत पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले.

शिकण्यासाठी आई-वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या आई-वडिलांसोबत वाशी नाका येथील सह्याद्री नगरच्या टॉवर हिल परिसरात राहायला गेली. घाटलागावात असलेल्या न्यु इरा शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर आईसारखेच दररोज दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे. पुन्हा घरी येऊन अभ्यास करायचा, असा तिचा नित्यक्रम सुरू झाला.

पुजाने ६४.०० टक्के गुण घेऊन दहावीमध्ये उत्तीर्ण होण्याचे तसेच शाळेतून पहिले येण्याचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी तिला लहान भावाने खूप प्रेरणा दिली. तसेच सहकार्य केले. सोबत आतेभाऊही रात्र शाळेत शिकत होता. त्यांनी मध्येच शाळा सोडली. मात्र, पुजाने जिद्द सोडली नाही. शिक्षक ही पालकांसारखे भेटले. ते अडचणीच्यावेळी मदत करत होते. पाठीवर थाप देत होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्हाला अधिकचे वर्ग घेऊन परीक्षेच्या काळात तयारी करून घेत होते. त्यामुळे दहावीत हे यश मिळाल्याचे पुजा म्हणाली.

शाळेत अत्यंत उपेक्षीत आणि शिक्षणापासून दूर असलेले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत असतो. यावेळी दहावीत सहा मुले यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. अशा रात्र शाळा आणखी चांगल्या चालण्यासाठी सरकारनेदेखील मदत करावी, असे न्यू इरा शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे म्हणाले.

Intro:घरकाम करतच ती ठरली वर्गातून टॉपर, वाशीनाक्यातील पुजा अहिरेची दहावीत गरूड भरारी !!Body:घरकाम करतच ती ठरली वर्गातून टॉपर, वाशीनाक्यातील पुजा अहिरेची दहावीत गरूड भरारी !!

(या बातमीसाठी मोजोवरून पुजा अहिरे हिचा बाईट आणि शाळेच्या मुख्याध्यापकासोबत १२१ केला असून तोही याला वापरावा)

मुंबई, ता. १० :
दहा वर्षांपूर्वी दहावीचे शिक्षण पूर्ण करता न आलेल्या पुजा अहिरेने दोन मुले सांभाळत आणि दिवसभर अनेक ठिकाणचे घरकाम करून दहावीच्या परीक्षेत गरूड भरारी घेत वर्गात टॉपर येण्याचा मान मिळावलाय. परिस्थितीवर मात करत तिने दहावीत उतीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण केलंय.
घाटलागावात असलेल्या न्यू इरा या रात्र शाळेतून ती सर्वाधिक गुण घेणारी पहिली विद्यार्थीनी ठरलीय. तिला ६४.०० टक्के इतके गुण मिळाले असून तिच्या यशाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
वाशी नाका येथील सह्याद्री नगरच्या टॉवर हिल परिसरात ती आपल्या आईवडिलांसोबत राहते. आईसोबत तीही चार ठिकाणची घरकाम करून कुटुंब चालवते. रोज दिवसभर घरकाम करायचे आणि रात्रशाळेत शिक्षण घ्यायचे. घरी जाऊन पुन्हा अभ्यास करायचा असा तिचा नित्यक्रम होता.
दहा वर्षापूर्वी कुटुंबातील परिस्थितीमुळे दहावीचे शिक्षण अर्धवट सुटले होते. त्यातच लग्न झाले. पुढे शिक्षणाचा मार्गच बंद झाला. परंतु मनात शिक्षणाची जिद्द कायम होती, त्यातूनच मार्ग मिळाला आणि तिने आज ही भरारी घेतली. घरकाम करत आपल्या मुलांचा सांभाळ करतच तिला पुढील शिक्षण घ्यायचेय. हातावर पोट असतानाही पुजाला खूप शिकायचंय. ती शिकून पोलीसात जाण्याचे स्वप्न पाहतेय. त्यासाठीची प्रतिक्रिया तिने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
वाशीनाका येथे असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर शाळेत ती २००८ मध्ये नववीत शिकत होती. मध्येच शिक्षण सुटले आणि अल्वयातच तिला लग्नाला सामोरे जावे लागले. त्याच दोन मुले झाली. शिकण्यासाठी खूप धडपड सुरू होती, परंतु पती, सासू यांचा विरोध होता. शिकण्यासाठी आई-वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि तिने आपले दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी तिला लहान भावाने खूप प्रेरणा दिली, सहकार्य केले. सोबत आतेभाऊही रात्र शाळेत शिकत होता, परंतु त्यांनी मध्येच शाळा सोडली. परंतु आपण जिद्द सोडली नाही. शिक्षक ही पालकांसारखे भेटले. ते प्रत्येक अडचणीवर मदत करत राहिले, पाठीवर थाप देत राहिले, सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्हाला अधिकचे वर्ग घेऊन परीक्षेच्या काळात तयारी करून घेतली म्हणूनच मला दहावीत हे यश मिळाल्याचे पुजा म्हणाली.
--
(यासाठी १२१ केलेला आहे तोही घ्यावा)
आमच्या शाळेत अत्यंत उपेक्षित आणि शिक्षणापासून दूर राहिलेले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत असतो. यावेळी सहा मुले यशस्वीरित्या दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. सरकारने अजून आम्हाला अधिकची मदत करून आमच्यासारख्या रात्र शाळा आणखी चांगल्या चालतील यासाठी काही वेगळे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा असल्याचे न्यू इरा हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.
Conclusion:घरकाम करतच ती ठरली वर्गातून टॉपर, वाशीनाक्यातील पुजा अहिरेची दहावीत गरूड भरारी !!
Last Updated : Jun 10, 2019, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.