ETV Bharat / state

BEST Bus Proposal Cancelled : केंद्र सरकारकडून अनुदान न मिळाल्याने १२०० बसेस घेण्याचा प्रस्ताव रद्द - बेस्ट बस खरेदी प्रस्ताव रद्द

आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती बद्दलण्यासाठी मुंबई महापालिकेकडून भरघोस मदत केली जात आहे. ( BMC BEST Bus Project ) बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर बसेस घेण्यासाठी केंद्र सरकारने निधी देण्याचे मान्य केले मात्र गेल्या चार महिन्यात निधीच दिला नाही. यामुळे १२०० बसेस घेण्याचा प्रस्ताव आज बेस्ट समितीच्या बैठकीत रद्द ( BEST Bus Proposal Cancelled ) करण्यात आला.

BEST Bus
बेस्ट बस
author img

By

Published : Feb 21, 2022, 10:12 PM IST

मुंबई - आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती बद्दलण्यासाठी मुंबई महापालिकेकडून भरघोस मदत केली जात आहे. ( BMC BEST Bus Project ) बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर बसेस घेण्यासाठी केंद्र सरकारने निधी देण्याचे मान्य केले मात्र गेल्या चार महिन्यात निधीच दिला नाही. यामुळे १२०० बसेस घेण्याचा प्रस्ताव आज बेस्ट समितीच्या बैठकीत रद्द ( BEST Bus Proposal Cancelled ) करण्यात आला.

केंद्र सरकारकडून अनुदान नाही -

बेस्टही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. कोरोना काळातही बेस्ट मुंबईकरांना परिवहन सेवा देत होती. प्रवाशांना चांगली सुविधा देता यावी यासाठी बेस्टने १२०० बस भाडेतत्वावरील बसेस घेण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतला. त्यासाठी निविदाही काढली. या सर्व बस वातानुकूलित वीजेवर धा‌वणाऱ्या आहेत. यात ८०० बस एकमजली आणि ४०० मिडी बस आहेत. या बस महाराष्ट्र शुद्ध हवा अभियानांतर्गतच घेतानाच केंद्र सरकारकडूनही अनुदान मिळणार होते. या बस खरेदीसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु केंद्र सरकारकडून अनुदानच प्राप्त झालेले नाही.

बसगाड्यांचा प्रस्ताव रद्द -

आज बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बेस्ट समितीतील शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याने तसेच होणारा खर्च यामुळे १२०० बसगाड्यांचा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना मांडली. त्याला काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून समर्थन मिळाल्याने बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी प्रस्ताव रद्द केला. दरम्यान, बस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची टीका भाजप सदस्यांनी केली.

हेही वाचा - Nagpur Family Court on Divorce : पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा क्रूरतेचा प्रकार; न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

निधी किती उपलब्ध बघून निर्णय घेऊ -

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १२०० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेऊन निविदाही काढल्या. यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार होते. परंतु अनुदानच प्राप्त न झाल्याने बस घेण्याचा विचार मागे पडला. त्यातच बेस्टकडेही निधी नाही. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र शुद्ध हवा अभियानांतर्गतच बस घेण्याचा विचार असला तरीही निधी किती उपलब्ध आहे हे बघूनच आणि पुढे बैठक घेऊनच निर्णय घेऊ, असे बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.