ETV Bharat / state

न्यायालयीन प्रक्रियेमुळे सेव्हन हिल्स रुग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव परत पाठवला - सदानंद परब

अंधेरी मरोळ येथील महापालिकेच्या जागेवरील सेव्हन हिल रूग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव न्यायलयीन प्रक्रियेमुळे परत पाठवण्यात आला असल्याची माहिती सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

author img

By

Published : Aug 14, 2019, 10:40 AM IST

सदानंद परब

मुंबई - अंधेरी मरोळ येथे पालिकेच्या भूखंडावर सेव्हन हिल रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयाकडून पालिकेच्या अटी शर्थींचा भंग केल्याने हे रुग्णालय पालिका ताब्यात घेणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या रुग्णालयाबाबत सुनावणी सुरू असल्याने अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

माहिती देताना सदानंद परब

मुंबई महानगरपालिकेची अंधेरी मरोळ येथील १७ एकर जागा सेव्हन हिल्सला देण्यात आली होती. या जागेवर १९४ कोटी रुपये खर्च करून सेव्हन हिल हे रुग्णालय उभारण्यात आले. पालिकेच्या भूखंडावर हे रुग्णालय असल्याने त्यामधील २० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या व गरीब रुग्णांवर उपचार करण्याची अट या रुग्णालयाला घालण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या अटी आणि शर्थींचा सेव्हन हिलने वेळोवेळी भंग केला. याबाबत नगरसेवकांनी अनेकवेळा स्थायी, आरोग्य, सुधार समिती तसेच सभागृहात आवाज उचलला होता. अखेर पालिका प्रशासनाने हे रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालय ताब्यात घेताना संचालकानी पालिकेच्या विविध करांचे १४० कोटी रुपये थकवले असल्याचे समोर आले. पालिका रुग्णालयात ताब्यात घेण्याची कारवाई करत असतानाच रुग्णालयात गुंतवणूक करणाऱ्यांनी हैदराबाद येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने याबाबात पुढील कारवाई करता येत नव्हती. आता पालिका सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. रुग्णालय पालिकेच्या ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली येथील एम्स सारख्या मोठ्या संस्थेला चालवण्यास दिले जाईल किंवा पालिका स्वतः हे रुग्णालय चालवेल, असे जोशी यांनी सांगितले.

सेव्हन हिल्स संस्थेने विविध ठिकाणी त्यांच्या असलेल्या संपत्तीच्या बदल्यात दीड हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यांनी पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या वास्तूवरही कर्ज घेण्याचा घाट घातला होता. पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर रुग्णालय ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. १७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर रुग्णालय ताब्यात घेउन ते कोणाला चालवायला द्यायचे त्याबाबत निर्णय घेऊ, असे परब यांनी सांगितले.

Intro:मुंबई - अंधेरी मरोळ येथे पालिकेच्या भूखंडावर सेव्हन हिल रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयाकडून पालिकेच्या अटी शर्थींचा भंग केल्याने हे रुग्णालय पालिका ताब्यात घेणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात या रुग्णालयाबाबत सुनावणी सुरू असल्याने अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आज प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.Body:मुंबई महानगरपालिकेची अंधेरी मरोळ येथील १७ एकर जागा मे. सेव्हन हिल्सला देण्यात आली होती. या जागेवर १९४ कोटी रुपये खर्च करून सेव्हन हिल हे रुग्णालय उभारण्यात आले. पालिकेच्या भूखंडावर हे रुग्णालय असल्याने त्यामधील २० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या व गरीब रुग्णांवर उपचार करण्याची अट या रुग्णालयाला घालण्यात आली होती. मात्र पालिकेच्या अटी आणि शर्थींचा सेव्हन हिलने वेळोवेळी भंग केला. याबाबत नगरसेवकांनी अनेकवेळा स्थायी, आरोग्य, सुधार समिती तसेच सभागृहात आवाज उचलला होता. अखेर पालिका प्रशासनाने हे रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालय ताब्यात घेताना संचालकानी पालिकेच्या विविध करांचे १४० कोटी रुपये थकवले असल्याचे समोर आले. पालिका रुग्णालयात ताब्यात घेण्याची कारवाई करत असतानाच रुग्णालयात गुंतवणूक करणाऱ्यानी हैदराबाद येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने याबाबात पुढील कारवाई करता येत नव्हती. आता पालिका सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. रुग्णालय पालिकेच्या ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली येथील एम्स सारख्या मोठ्या संस्थेला चालवण्यास दिले जाईल किंवा पालिका स्वता हे रुग्णालय चालवेल असे जोशी यांनी सांगितले.

सेव्हन हिल्स संस्थेने विविध ठिकाणी त्यांच्या असलेल्या संपत्तीच्या बदल्यात १४००-१५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यांनी पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या वास्तूवरही कर्ज घेण्याचा घाट घातला होता. पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर रुग्णालय ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. १७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय आला की रुग्णालय ताब्यात घेतले जाईल त्यानंतर ते कोणाला चालवायला दयायचे त्याबाबत निर्णय घेऊ असे सदानंद परब यांनी सांगितले.

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांचा बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.