ETV Bharat / state

अकरावीच्या जागा वाढवून दिल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर

शालेय शिक्षण विभागाने ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे, अशा महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अकरावीला ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना त्या-त्या ठिकाणी अधिकची संधी मिळणार आहे. मात्र, यामुळे अकरावीच्या रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे
author img

By

Published : Jul 11, 2019, 9:57 PM IST

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुल्यांकनाचे गणित चुकल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याच्या नावाखाली अकरावीसाठी काही महाविद्यालयांमध्ये १० टक्के प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अकरावीच्या रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे

शालेय शिक्षण विभागाने ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे, अशा महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वाणिज्य आणि कला शाखेसाठी ८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ५ टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अकरावीला ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना त्या-त्या ठिकाणी अधिकची संधी मिळणार असल्याची माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

आत्तापर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे. पहिल्या सामान्य प्रवेश यादीत विद्यार्थ्यांचा कल लक्षात आल्याने नेमक्या कोणत्या महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याची गरज आहे, हेही स्पष्ट झाले असल्याचे अहिरे म्हणाले.
दरम्यान, मुंबईत अकरावीच्या प्रवेशासाठी एकुण ३,१९,१८६ जागा उपलब्ध आहेत. त्या जागांपैकी १,८५,४७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज केला आहे. याची‍ माहिती सर्वसाधारण यादीत समोर आली असल्याने उर्वरित १ लाख ३३ हजार ७०९ जागा शिल्लक राहणार असल्याचे समोर आले आहे. अशी स्थिती पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी‍ ठिकाणी आहे. त्यात शिक्षण विभागाने पुन्हा जागा वाढवून दिले आहे. त्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न हा अनेक नवीन महाविद्यालयांसाठी अडचणींचा ठरणार असल्याचे सिस्कॉम संस्थेच्या प्रमुख वैशाली बाफना यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, की या जागा वाढविल्यामुळे काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीची प्रवेश क्षमता १२० आहे. परंतु त्या वर्गात प्रत्यक्ष ७० विद्यार्थी देखील बसू शकत नाही. अशा परिस्थितीत १३२ विद्यार्थ्यांना कसे बसवता येईल? तसेच विद्यार्थ्यांना नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल. परंतु, प्रोजेक्ट, परीक्षा, वर्कशॉप यांचे आयोजन काय व कसे करणार? एक शिक्षक इतक्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकतील का? असे अनेक प्रश्न कसे सोडवले जातील, असे बाफना यांनी सरकारला विचारले आहे.

तसेच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. कनिष्ठ महाविद्यालयांचे नावलैकिक टिकविण्यासाठी विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होतील. परंतु, या विद्यार्थ्यांना ज्ञान व गुणवत्तापूर्ण शिक्षण खरच मिळणार का? याचा विचार व्हायलाच हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Intro:
अकरावीच्या जागा वाढवून दिल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर
slug :
mh-mum-educ-11th-admi-rajendra-ahire-byte-7201153
mh-mum-educ-11th-admi-educ-office-7201153
(हे बाईट आणि व्हीज्युवल मोजोवरून पाठवत आहे, ते वापरावेत)
मुंबई, ता. ११ :

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुल्यांकनाचे गणित चुकल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याच्या नावाखाली अकरावीसाठी काही महाविद्यालयांमध्ये १० टक्के प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अकरावीच्या रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे, अशा महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वाणिज्य आणि कला शाखेसाठी ८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ५ टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयामुळे अकरावीला ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना त्या-त्या ठिकाणी अधिकची संधी मिळणार आहे असल्याची माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आत्तापर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत सुरू असून असून पहिल्या सामान्य प्रवेश यादीत विद्यार्थ्यांचा कल लक्षात आला असल्याने नेमक्या कोणत्या महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याची गरज आहे, हेही स्पष्ट झाले असल्याचे अहिरे म्हणाले.
दरम्यान मुंबईत अकरावीच्या प्रवेशासाठी एकुण 3,19,186 जागा उपलब्ध आहेत. त्या जागांपैकी 1,85,477 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज केला असून त्याची‍ माहिती सर्वसाधारण यादीत समोर आली असल्याने उर्वरित 1 लाख 33 हजार 709 जागा शिल्लक राहणार असल्याचे समोर आले आहे. अशी स्थिती पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी‍ ठिकाणी असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा त्यात जागा वाढवून दिल्याने रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न हा अनेक नवीन महाविद्यालयांसाठी अडचणींचा ठरणार असल्याचे सिस्कॉम संस्थेच्या प्रमुख वैशाली बाफना यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, या जागा वाढविल्यामुळे काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीची प्रवेश क्षमता १२० आहे, परंतु त्या वर्गात प्रत्यक्ष ७० विद्यार्थी देखील बसू शकत नाही. अशा परिस्थितीत १३२ विद्यार्थ्यांना कसे बसवता येईल? तसेच विद्यार्थ्यांना नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल परंतु प्रोजेक्ट, परीक्षा, वर्कशॉप यांचे आयोजन काय व कसे करणार? एक शिक्षक इतक्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देवू शकतील का? असे अनेक प्रश्न कसे सोडवले जातील, असे बाफना यांनी सरकारला विचारले आहे.
तसेच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. कनिष्ठ महाविद्यालयांचे नावलैकिक टिकविण्यासाठी विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होतील, परंतु या विद्यार्थ्यांना ज्ञान व गुणवत्तापूर्ण शिक्षण खरच मिळणार का? याचा विचार व्हायलाच हवा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Body:
अकरावीच्या जागा वाढवून दिल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.