ETV Bharat / state

Narendra Dabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयचा तपास पूर्ण - दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयचा तपास पूर्ण

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयचा तपास पूर्ण झाला आहे. नव्या तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर झाला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातील साक्षही पूर्ण झाली आहे.

Narendra Dabholkar Murder Case
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड
author img

By

Published : Jan 30, 2023, 3:59 PM IST

Updated : Jan 30, 2023, 4:31 PM IST

मुंबई : नव्या तपास अहवालावर सीबीआय तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. खटल्यातील आरोपींच्यावतीने याप्रकरणी आता हायकोर्टाची देखरेख संपवण्याकरिता याचिका दाखल केली आहे.

सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करणार : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा तपास नव्यान सुरू करण्यात आला होता. तोसुद्धा पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

दाभोलकर प्रकरणी १५ साक्षीदारांची साक्ष : आज ( ३० जानेवारी ) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा अनिल सिंग यांनी सांगितले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची गरज नाही. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तपासाचा अहवाल पाठवण्यात आला आहे. यावर तीन आठवड्यात सीबीआय आपला निर्णय जाहीर करेल, असे सिंग यांनी सांगितले.

याला वकिलाचा विरोध : डॉ. दाभोळकर हत्याकांडाच्या तपासाप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून, पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेऊ नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी न्यायालयात केली. याला दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी विरोध दर्शवला. दाभोलकर हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. हत्येसाठी वापरलेली दुचाकी आणि हत्यार सापडलेले नाही. हत्येचे कारण समोर आले नसून, सूत्रधारचा शोध लागला नाही. त्यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे, असे नेवगी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Doctor Removed Stone From Brain In Shirdi: डॉक्टरांनी काढला चक्क मेंदूमधून दगड, साईबाबा रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल

Last Updated : Jan 30, 2023, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.