ETV Bharat / state

Budget Session 2023 : अजित पवार, अंबादास दानवे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून हक्कभंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच अंबादास दानवे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाविरोधात एक, विरोधी पक्षाविरोधात दोन हक्कभंग दाखल करण्यात आले आहेत.

Infringing Proposal
Infringing Proposal
author img

By

Published : Mar 2, 2023, 8:42 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांचे देशद्रोही, तर संजय राऊत यांचे विधानमंडळ नव्हे चोरमंडळ या दोन्ही प्रकरणात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग मांडण्यात आला होता. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. शिमगा झाल्यानंतर या हक्कभंगावर निर्णय घेतला जाईल, असे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाविरोधात एक, विरोधी पक्षाविरोधात दोन हक्कभंग दाखल करण्यात आले आहेत.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी : राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर सकाळच्या सत्रात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज चालू झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे राम शिंदे यांनी हक्कभंग मांडला होता. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना देशद्रोही संबोधल्याने हक्कभंग मांडला होता.

पवार, दानवे विरोधात हक्कभंग प्रस्ताव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावावर खुलासा केला. तर, खासदार संजय राऊत यांच्या विधानावर सात दिवसात लेखी स्वरूपात खुलासा मागवणार असल्याचे स्पष्ट केले. हा वाद सुरू असतानाच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी, महाराष्ट्र द्रोहांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकल्याचे सांगितले.

होळीनंतर कारवाई : सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा यामुळे अवमान झाला असून हीन भाषेतील हे विधान आहे. विरोधी पक्षनेत्याना हे विधान शोभणारे नाही. त्यामुळे या नेत्यांच्या विरोधात आज हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी सभापती गोऱ्हे यांच्याकडे केली. नऊ सदस्यांचे पत्र सभापती गोऱ्हे यांना दिले आहे. सत्ताधारी भाजप पक्षाचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेत्यांची विधाने तपासून घेण्यात येतील. होळी-शिमग्यानंतर कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेऊ, असे सभापती गोऱ्हे यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा खुलासा : कोल्हापुरात पत्रकार परिषदेत विधीमंडळावर टीका करताना खासदार संजय राऊत यांचा तोल गेला होता. त्यामुळे दोन्ही सभागृहात मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला आमदार प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा - Chinchwad By Election Result : चिंचवड पोटनिवडणुकीत कमळ फुलले; अश्विनी जगताप यांचा 36 हजार 770 मतांनी विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.