मुंबई - महानगरपालिकेच्या 4 फार्मासिस्टला कोरोनाची लागण झाल्याने ते धास्तावले आहेत. मात्र, त्याचवेळी आता खासगी फार्मासिस्टच्याही चिंता वाढल्या आहेत. त्यामुळेच खासगी फार्मासिस्टनीही पीपीई किट आणि 50 लाखांचा विमा मिळावा, अशी मागणी उचलून धरली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व औषध दुकाने काही ठराविक वेळेत सुरू आहेत. विक्रेते आणि फार्मासिस्ट थेट रुग्णांच्या संपर्कात येतात. अशात जर कोरोनाबाधित रुग्ण यात असेल तर फार्मासिस्टनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. पालिकेच्या 4 फार्मासिस्टना लागण झाल्यानंतर ही शक्यता खरी ठरली आहे. त्यामुळे आता खासगी फार्मासिस्ट धास्तावले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी खासगी फार्मासिस्टला ही पीपीइ किट आणि 50 लाखांचा विमा देण्याची मागणी केली आहे.