ETV Bharat / state

संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावीत - राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाबाबत काय परिस्थिती आहे? याबाबत माहिती दिली. तसेच खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Health minister rajesh tope  आरोग्यमंत्री राजेश टोपे  आरोग्यमंत्री फेसबुक लाईव्ह  rajesh tope facebook live  corona update  maharashtra corona
संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावेत - राजेश टोपे
author img

By

Published : Mar 27, 2020, 2:41 PM IST

मुंबई - कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी क्लिनिक, रुग्णालये बंद ठेवू नये. अशा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या. तसेच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे आणि नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले. तसेच राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले.

आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे -

  1. राज्यात सध्या १३५ बाधित रुग्ण आहेत. आतपर्यंत ४ हजार २२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४ हजार ०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले.
  2. शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.
  3. कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू राहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी रुग्णालये सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी रुग्णालय बंद ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.
  4. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदी काळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  5. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे, असे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत.
  6. बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसिंगनंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करत आहे.
  7. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.