ETV Bharat / state

'प्रिन्स'च्या पालकांनी नाकारली पालिकेची 5 लाखांची रक्कम - मुंबई बातमी

हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेश येथील 2 महिन्यांच्या प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरू असताना ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजल्याने त्याचा 1 हात कापावा लागला आहे.

'प्रिन्स'च्या पालकांनी नाकारली पालिकेची 5 लाखांची रक्कम
author img

By

Published : Nov 20, 2019, 7:26 AM IST

Updated : Nov 20, 2019, 10:37 AM IST

मुंबई - केईएम रुग्णालयात शॉर्टसर्किट होऊन आगीत भाजलेल्या प्रिन्सवर आजही उपचार सुरू आहे. यामध्ये त्याचा एक हात कापण्यात आला असून त्याच्या हालचाली आणि खाण्यापिण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्याच्या आईवडिलांनी पालिकेकडून दिलेली 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली आहे. नुकसान भरपाईबाबत धोरण ठरवण्यासाठी आज गटनेत्यांची बैठक आहे. बैठकीमध्ये प्रिन्सला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा - अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी

हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेश येथील 2 महिन्यांच्या प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरू असताना ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजल्याने त्याचा 1 हात कापावा लागला आहे. सध्या प्रिन्सची प्रकृती पाहता त्याच्या अनेक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याला न्यूमोनिया असल्याचे समोर आले आहे. फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा पॅच दिसून आला असून त्याचे पोट फुगले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार, राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

प्रिन्सच्या जखमांना संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अजूनही प्रिन्सची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. तसेच, प्लास्टिक सर्जनकडून त्याच्यावर मलमपट्टी केली जात आहे. तसेच, त्याला ऐकू येत आहे की नाही, त्याची देखील तपासणी केली गेली. दरम्यान, प्रिन्सच्या छातीच्या एक्स-रेमध्ये एक छोटा बिंदू आढळला असून तो न्यूमोनियाचा असू शकतो, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोटाचे कार्यही मर्यादित झाल्यामुळे त्याच्या खाण्यावर बंधने आली आहेत. पण, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे केईएम प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रिन्सची प्रकृती गंभीर असताना त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्याचा उपचाराचा व शिक्षणाचा खर्च पालिकेने करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेने प्रिन्सच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देऊ केले. हे 5 लाख रुपये प्रिन्स 18 वर्षाचा झाल्यानंतर वापरता येतील असे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रिन्सच्या उपचारासाठी सध्या खर्च करण्याची गरज असताना दिलेली रक्कम उपचारासाठी वापरता येणार नसल्याने प्रिन्सच्या आई-वडिलांनी ही रक्कम नाकारली आहे. दरम्यान, याबाबत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक असून त्यात प्रिन्सला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर चर्चा होणार आहे.

Intro:मुंबई - केईएम रुग्णालयात शॉक सर्किट होऊन लागलेल्या आगीत भाजलेल्या प्रिन्सवर आजही आयसीयूत व्हेंटिलेटरवर आहे. त्याचा एक हात कापण्यात आला असून त्याच्या हालचाली आणि खाण्यापिण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्याच्या आईवडिलांनी पालिकेकडून दिलेली 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली आहे. नुकसान भरपाईबाबत धोरण ठरवण्यासाठी आज गटनेत्यांची बैठक असून त्यात प्रिंसला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर निर्णय घेतला जाणार आहे. Body:हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेश येथील दोन महिन्यांच्या प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजल्याने त्याचा एक हात कापावा लागला आहे. सध्या प्रिन्सची प्रकृती पाहता त्याच्या अनेक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याला न्यूमोनिया असल्याचे समोर आले आहे. फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा पॅच दिसून आला असून त्याचे पोट फुगले असल्याची माहिती मिळते.

प्रिन्सच्या जखमांना संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अजूनही प्रिन्सची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. तसेच, प्लास्टिक सर्जनकडून त्याच्यावर मलमपट्टी केली जाते. तसंच, त्याला ऐकू येत आहे की नाही त्याची देखील तपासणी केली गेली. दरम्यान, प्रिन्सच्या छातीच्या एक्स-रेमध्ये एक छोटा बिंदू आढळला असून तो न्यूमोनियाचा असू शकतो, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोटाचे कार्यही मर्यादित झाल्यामुळे त्याच्या खाण्यावर बंधने आली आहेत. पण, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे केईएम हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रिन्सची प्रकृती गंभीर असताना त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्याचा उपचाराचा व शिक्षणाचा खर्च पालिकेने करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र पालिकेने प्रिन्सच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देऊ केले. हे 5 लाख रुपये प्रिन्स अठरा वर्षाचा झाल्यानंतर वापरता येतील असे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रिन्सच्या उपचारासाठी सध्या खर्च करण्याची गरज असताना दिलेली रक्कम उपचारासाठी वापरता येणार नसल्याने प्रिन्सच्या आई वडिलांनी ही रक्कम नाकारली आहे. दरम्यान याबाबत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक असून त्यात देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर चर्चा होणार आहे.Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.