ETV Bharat / state

आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात सजली दुकाने; रविवारी साजरा होणार उत्सव - chaityabhumi

चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकानात विविध कंदील, फेटा, निळे, झेंडे, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत

चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकान
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:15 PM IST

मुबंई - डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या १२८ व्या जयंतीनिम्मित चैत्यभूमी परिसरातील दुकाने कंदील, फेटा, तसबिरी आदी विविध वस्तूंनी सजले आहेत. बाबासाहेबांची जयंती संपूर्ण भारतात रविवारी मोठ्या आंनदात साजरी केली जाणार आहे.

चैत्यभूमी परिसरातील दुकानदारांच्या प्रतिक्रिया

चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकानात विविध कंदील, फेटा, निळे, झेंडे, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. निवडणुकीचा कोणताही परिणाम विक्रीवर झालेला नाही. यावेळी चीनवरून काही वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत, असे सुरेश निकाळजे आणि अर्जुन केदार या विक्रेत्यांनी सांगितले.

चैत्यभूमी परिसरातही जयंतीनिमित्त रंगरंगोटीचे काम जोरात सुरू असून मुंबईतील आंबेडकरी बालेकिल्ल्यात जयंतीच्या कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे. प्रशासनाकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचा मोसम सुरू असल्याने यंदाची जयंती वेगळी असणार, यात शंकाच नाही.

Intro:मुबंई ।
डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या 128 व्या जयंती निम्मित चैत्यभूमी परिसरातील दुकाने कंदील, फेटा, तसबिरी आदी विविध वस्तूंनी सजली आहेत. बाबासाहेबांची जयंती ही शोषितांचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. बाबासाहेबांनी आयुष्यभर त्रास सहन करून बहुजनांच्या, दलितांच्या उद्धारासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावले. कुटूंबाचाही विचार केला नाही. म्हणून या महामानवाचा जन्मदिवस उत्सवासारखा पूर्ण भारतात रविवारी साजरा केला जाणार आहे.Body:डॉ. आंबेडकर यांची 128 जयंती निम्मित चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकानात विविध कंदील, फेटा, निळे, झेंडे, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा मिळत आहे.
यावेळी विविध कंदील आम्ही विक्रीसाठी ठेवले आहेत. निवडणुकीचा कोणताही परिणाम विक्रीवर झालेला नाही. यावेळी प्रतिसाद खूप उत्तम आहे. शोषित वर्गाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी चायना वरून काही वस्तू विक्रीसाठी आले आहेत असे सुरेश निकाळजे आणि अर्जुन केदार या विक्रेत्यांनी सांगितले.

चैत्यभूमी परिसरात ही जयंतीनिमित्त रंगरंगोटीचे काम जोरात सुरू आहे. तसेच मुंबईतील आंबेडकरी बालेकिल्ल्यात जयंतीच्या कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकिचा मोसम सुरू असल्याने यंदाची जयंती वेगळी असणार, यात शंकाच नाही.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.