ETV Bharat / state

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला - raining

राज्याच्या विविध भागात सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामांन्यही समाधानी झाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा
author img

By

Published : Jun 9, 2019, 11:26 PM IST

Updated : Jun 10, 2019, 12:01 AM IST

मुंबई - एकीकडे राज्यात दुष्काळामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. तर, दुसरीकडे उष्णतेमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या विविध भागात सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. अकोल्यात शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. शहरातील वीजपुरवठा मात्र काही काळासाठी खंडीत झाला होता. इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला. यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरनगर भागात अनेक ठिकाणी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चाहूल लागली असून येत्या काही दिवसात पेरणीसाठी शेत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
पुण्यामध्ये गेल्या काही तासांपूर्वी जोरदार पाऊस झाला, जणू मान्सूनच आला की काय एवढा पाऊस पुण्यामध्ये आज बरसला. बारातमीमध्येही विजेचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तिकडे कोकणात सिंधुदुर्गमध्ये वैभववाडीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वैभववाडीत अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
ठाण्यात जिल्ह्यात शहापूर तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या डोळखांब परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शहापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. यावेळी विजांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसामुळे घुईखेडमध्ये २४ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित होता.

सोलापूर शहरात शनिवारी भल्या सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. राज्यात मान्सून १४ जूननंतर सक्रिय होणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरीही सोलापूर शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहर व परिसरात आज चांगल्या पावसाला सुरुवात झाली. एकंदरीतच शनिवार आणि रविवार या २ दिवसात राज्यात अनेक जिल्ह्यात वरुणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामांन्यही समाधान मानत आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : Jun 10, 2019, 12:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.