ETV Bharat / state

'त्या' आमदाराची 'डीएनए' चाचणी केली पाहिजे - प्रवीण दरेकर

महाविकास आघाडीतील एका आमदारावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोप केला आहे. एका मुलाने डीएनए चाचणीची मागणी केली होती. मात्र, त्या आमदाराने त्याला आपल्या मित्राच्या घरी डांबून ठेवले होते. त्या आमदाराची चौकशी व्हावी व कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

pravin darekar
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Mar 3, 2021, 5:39 PM IST

Updated : Mar 3, 2021, 6:29 PM IST

मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व नंतर संजय राठोड यांचे प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए चाचणी मागणी आज (3 मार्च) विधानपरिषदेत करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्यांनी संबंधित आमदाराचे नाव जाहीर केले नसून लवकरच नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले.

प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सरकारमधील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश केला आहे. राज नावाचा एक मुलगा असून माझ्या वडिलांची डीएनए चाचणी करावी, अशी याचिका या मुलाने न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर संबंधित आमदाराने मुलाला सूरत येथील आपल्या मित्राकडे ठेवले होते व त्या ठिकाणी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर मुलगा व मुलाची आई वसईच्या एका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी तक्रार घेतली नाही. आज तो मुलगा न्याय मागत आहे. सध्या तो मुलगा व्यसनाधिन झाला असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल होता गुन्हा

याच लोकप्रतिनिधीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. नंतर त्यांचे नाव त्यातून काढण्यात आले. गणेश नायडू या त्याच्या मित्राने खादी ग्रामोद्योग 15-16 एकर अशी कोट्यवधींची जागा हडपली आहे, असा आरोप केला आहे. सत्तेच्या जोरावर त्या आमदारावर कारवाई होत नाही. न्यायालयात डीएनएबाबतचे प्रकरण प्रलंबीत आहे. या आमदारावर कारवाई झाली पाहिजे तसेच त्या महिलेला व त्या मुलाला संरक्षण द्यावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

हेही वाचा - मुंबईत गुरुवारी 128 टक्के लसीकरण, आतापर्यंत 1 लाख 47 हजार 438 कर्मचाऱ्यांना लस

Last Updated : Mar 3, 2021, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.