मुंबई : ती स्पेशल चाइल्ड आहे. तिचे पुढे कसे होईल? तिला सर्व जमेल का? असे अनेक प्रश्न मला विचारले जात होते. माझी मुलगी (Prasiddhi Kamble Gold Medal) जेव्हा पोहायला लागली तेव्हा लोकांनी नावं ठेवली. पण, आज माझ्या मुलीने तिचे नाव सार्थकी लावले (Special Olympics Swimming Competition) आहे, हे उद्गार आहेत रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या प्रकाश कांबळे यांचे. त्यांच्या मुलीने स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पोहण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे तिचा गौरव होत आहे. यामुळे प्रकाश कांबळे यांची छाती अभिमानाने फुलून आली आहे.
प्रसिद्धीची ऐकण्याची व बोलण्याची क्षमता कमी असल्याने ती विशेष मुलांच्या सुलभ शाळेत शिकत आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांनी तिची खेळातली आवड पाहून तिच्याकडून पोहण्याची प्रॅक्टिस करून घेतली. माझी मुलगी पोहायला लागली तेव्हा अनेकांनी तिला नावं ठेवली, पण नंतर तिने आमचे नावलौकिक केले - प्रकाश कांबळे, प्रसिद्धीचे वडील
भारताला सुवर्णपदक मिळवून दिले - चेंबूरमधील प्रसिद्धी कांबळे या मुलीने स्पेशल ऑलिम्पिकमधील पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. २१ जूनला पार पडलेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्वीमिंग स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात २५ मीटर फ्री स्टाइलमध्ये प्रसिद्धी कांबळेने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. प्रसिद्धी कांबळे हिने बर्लिनमध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमधील पोहण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. प्रसिद्धी ही वडील प्रकाश कांबळे आणि आई सुषमा कांबळे यांच्यासोबत चेंबूरच्या पंचशील नगरमध्ये एका छोट्या घरात भाड्याने राहते.
कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती जेमतेम - प्रसिद्धी ही एक स्पेशल चाईल्ड आहे. प्रसिद्धीची ऐकण्याची व बोलण्याची क्षमता कमी असल्याने ती विशेष मुलांच्या सुलभ शाळेत शिकत आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक सुनील आडे आणि मुख्याध्यापिका अनुराधा जठार यांनी तिची खेळातली आवड पाहून तिच्याकडून पोहण्याची प्रॅक्टिस करून घेतली, असे तिचे वडील प्रकाश कांबळे सांगतात. प्रसिद्धीचे पोहण्यातील कसब आणि वेग पाहून तिच्या क्रीडा शिक्षकांनी तिला बर्लिन येथे होणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांगितले. शाळेने आणि घरच्यांनी देखील या स्पर्धेला पाठविण्याची तयारी दर्शवली. येथूनच प्रसिद्धीचा सुवर्णपदकच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कांबळे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. प्रकाश कांबळे हे दिवसभर रिक्षा चालवतात तर सुषमा कांबळे या गृहिणी आहेत.
पोहण्याची जिद्द - प्रसिद्धीची पोहण्याची आवड पाहून वडिलांनी पदरमोड करत तिला पोहण्याच्या क्लासला दाखल केले. तिचे वडील घाटकोपर येथील ओडियन तरण तलाव व नंतर चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलावात प्रशिक्षणासाठी घेऊन जातात. सध्या प्रसिद्धीच्या पोहण्याच्या क्लासचा खर्च हा तिचे कुटुंब आणि शाळा एकत्रित करत आहेत.
सरकारकडून मदतीची अपेक्षा - प्रसिद्धीचा सत्कार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील केला आहे. या सत्कारावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीसुद्धा तिथे उपस्थित होत्या. महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा भत्ता आणि पुरस्कार किंवा इतर ज्या सवलती आहेत या लवकरात लवकर मिळाव्यात अशी तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. तसेच शासनाकडून नोकरी देण्यात यावी, अशी अपेक्षा देखील प्रसिद्धीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -