ETV Bharat / state

Bhima Koregaon Case: ॲड. प्रकाश आंबेडकरांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांच्या बाबत केली मोठी मागणी - Prakash Ambedkar Wrote letter

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पाठवले आहे.

Bhima Koregaon Case
प्रकाश आंबेडकरांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र
author img

By

Published : Jun 6, 2023, 7:01 PM IST

मुंबई : 2018 साली कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोग गठीत करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या साक्षी आतापर्यंत नोंदवण्यात आल्या. प्रकाश आंबेडकर यांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलवले होते. पण पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपण येऊ शकत नसल्याचे उत्तर दिले. पण याच वेळी त्यांनी माझी साक्ष घेण्याआधी देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, माजी पोलीस अधीक्षक यांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एल्गार परिषदेचे आयोजन: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये सह्याद्री अतिथी गृहामध्ये नियमित प्रकारे विशेष चौकशी सुरू आहे. या संदर्भात चौकशी कामी हजर राहण्याचे शासनाने समन्स बजावल्या असता प्रकाश आंबेडकर यांनी आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव सुवेज मालिक यांची साक्ष तपासू द्या, मग मी हजर राहीन अशा प्रकारचे खरमरीत पत्र त्यांनी आयोगाला लिहिले आहे. तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणी एक जानेवारी 2018 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे आयोजन झाले होते. त्याआधी 31 डिसेंबरला पुण्यातील शनिवार वाड्यावर पुरोगामी संघटनांकडून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती बी. बी .सावंत, न्यामूर्ती कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर हे या परिषदेचे आयोजक होते. कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांसह देशभरातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते या एल्गार परिषदेला उपस्थित होते.

भीमा कोरेगाव चौकशी आयोग नेमले: या परिषदेनंतर जी दंगल झाली, त्यामध्ये अनेक व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काही तुरुंगात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र भीमा कोरेगाव चौकशी आयोग नेमले आहे. त्या आयोगाकडून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना समन्स बजावले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील त्या आयोगा समोर चौकशी कामी हजर व्हावे लागले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने 5 जून रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात होणाऱ्या विशेष चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले होते. त्या समस्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येत नाही, असे नमूद करत आयोगाला खरमरीत पत्र लिहिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रात काय आहे: भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपण मला दिनांक 5 जून 2023 रोजी बोलाविले आहे. परंतु यादिवशी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी मुंबईत नसल्यामुळे हजर राहू शकत नाही. मी दिनांक 14 जून व 15 जून 2023 रोजी मुंबईत आहे. या तारखांना साक्ष ठेवल्यास मी हजर राहू शकेन. कामाच्या व्यस्ततेमुळे ते हजर राहू शकत नाही असे त्यांनी पत्रात लिहले आहे.

हेही वाचा -

  1. Bhima Koregaon case भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे एनआयए व महाराष्ट्र सरकारला त्वरित उत्तर दाखल करण्याचे निर्देश
  2. Varavara Rao भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठीच्या अर्जाची पडताळणी करा मुंबई उच्च न्यायालयाचे एनआयएला निर्देश
  3. Bhima Koregaon Case भीमा कोरेगाव प्रकरणी उच्च न्यायालयाने एनआयएला बजावली नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.