ETV Bharat / state

..तर कोल्हापूर-सांगली जिल्ह्यावरील संकट टळले असते - प्रकाश आंबेडकर - कोल्हापुरातील पूर

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर सरकारतर्फे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे. तर, सरकारने जाणीवपूर्वक त्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. आंबेडकर भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर सरकार आणि संबंधित प्रशासन यंत्रणाही कशी अपयशी ठरली यावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Aug 12, 2019, 9:44 PM IST

मुंबई - सांगली कोल्हापुरात आलेल्या पूरासाठी सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर, हजारो लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जबाबदार असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. सरकारने या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर वेळीच उपायोजना केली असती तर आलेले संकट टळले असते असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर सरकारतर्फे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे. तर, सरकारने जाणीवपूर्वक त्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. आंबेडकर भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर सरकार आणि संबंधित प्रशासन यंत्रणाही कशी अपयशी ठरली यावर टीका केली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने नियोजन पद्धतीने विविध धरणातील पाणी सोडायला हवे होते, पण ते सोडले गेले नाही. आठ दिवसांपासूनची परिस्थिती बघता सरकारची अजून मदत मिळाली नाही. जे लोक बसमध्ये अडकले त्यांच्यासाठी सरकारने काही केले नाही, मात्र स्थानिक लोकांनी मदत केली. इतका मोठा प्रसंग घडला असतानाही त्याला सरकारने गांभीर्याने घेतले नाही. कोल्हापुरात अजूनही अन्न धान्याचा तुटवडा असून लोकांची मागणी सुरू आहे. मात्र, सरकार या ठिकाणी विमान आणि हेलिकॉप्टरमधून लोकांना अन्न धान्य उपलब्ध करून देत नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. सरकार या भागात मदत देण्यासाठी दुजाभाव करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

पुराच्या परिस्थितीमुळे या भागातील ७० हजार लोक बाधित आणि बेघर झाले आहेत. या लोकांना जवळच्या गावातील लोक जेवण पुरवत आहेत. २ लाख ३९ हजार २२ जनावरे गेली असून अजूनही सरकारची मदत येथे जात नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबदार असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाणी उतरणार नाही अशी परिस्थिती आहे, सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले असल्याने लोक त्यांना वेळीच आपली जागा दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, येत्या दहा दिवसात सरकारने किती पाऊस पडेल याचा अंदाज घेऊन भरलेल्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे, पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

Intro:सरकारने वेळीच उपाययोजना केली असती तर कोल्हापूर - सांगली जिल्ह्यावरील संकट टळले असते - प्रकाश आंबेडकर

mh-mum-01-prakash-ambedkar-byte-7201153
( Mojovar पाठवले आहेत)

मुंबई, ता. १२:

सांगली कोल्हापूर आलेल्या पुरासाठी
या ठिकाणी सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर हजारो लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जबाबदार असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आरोपी प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. सरकारने या जिल्ह्यांतील पूर परिस्थितीवर वेळीच उपायोजना केली असती तर आलेले संकट टळले असते असेही ते म्हणाले.
सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर सरकार करून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून सरकारने जाणीवपूर्वक त्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोपही त्यांनी केला.आंबेडकर भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर सरकार आणि संबंधित प्रशासन यंत्रणाही कशी अपयशी ठरली त्यावर त्यांनी टीका केली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने नियोजन पद्धतीने विविध धरणातील पाणी सोडायला हवे होते पण ते सोडले नाही,
आठ दिवसांपासून सरकारची अजून मदत मिळाली नाही, स्थानिक लोक मदत करत आहेत. जे लोक बस मध्ये अडकले त्यांच्यासाठी काही केले नाही, मात्र स्थानिक लोकांनी मदत केली. इतका मोठा प्रसंग घडला असता त्याला सरकारने गांभीर्याने घेतले नाही. अजूनही कोल्हापुरात अन्न धान्य याचा तुटवडा असताना लोक मागणी करत आहेत मात्र सरकार या ठिकाणी विमान आणि हेलिकप्टरमधून लोकांना अन्न धान्य उपलब्ध करून देत नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. सरकार या भागात मदत देण्यासाठी दूजाभाव करत असल्याचा आरोपही त्यानी केला.
पुराच्या परिस्थितीमुळे आज या भागात
७० हजार लोक बाधित आणि बेघर झाले आहेत, या लोकांना जवळच्या गावातील लोक जेवण पुरवत आहेत, २ लाख ३९ हजार २२ जनावरे गेली असून अजूनही सरकारची मदत येथे जात नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबदार असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाणी उतरणार नाही अशी परिस्थिती आहे, सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले असल्याने लोक त्यांना वेळीच आपली जागा दाखवतील असा इशाराही त्यांनी दिला.
येत्या दहा दिवसात सरकारने किती पाऊस पडेल याचा अंदाज घेऊन भरलेल्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, यामुळे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

Body:सरकारने वेळीच उपाययोजना केली असती तर कोल्हापूर - सांगली जिल्ह्यावरील संकट टळले असते - प्रकाश आंबेडकर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.