ETV Bharat / state

8 डिसेंबरला मुंबईत सर्व धर्मीय शांती सभेचे आयोजन - प्रकाश आंबेडकर - All Religions shanti Sabha

Prakash Ambedkar Press Conference : इस्रायल आणि पॅलेस्टाईन देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात शांतता राहावी या उद्देशाने, वंचितच्यावतीनं आठ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) सर्व धर्मीय शांती सभेचं आयोजन (All Religions shanti Sabha) करण्यात आल्याची माहिती, प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Prakash Ambedkar News
प्रकाश आंबेडकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 4:40 PM IST

Updated : Dec 5, 2023, 4:45 PM IST

मुंबई Prakash Ambedkar Press Conference : आझाद मैदानावर (Azad Maidan) सर्व धर्मीय शांती सभा (All Religions shanti Sabha) आयोजित करण्यात आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाबाबत मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. या युद्धला मुस्लिम अँगल दिला जातोय. युनायटेड नेशन आणि भारत या दोन्ही देशांची भूमिका आहे. या देशांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका भारताने अधोरेखित केली आहे. या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारने शांततेसाठी भूमिका घ्यायला हवी. यासाठी केंद्र सरकारने ठराव करून अमलात आणावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

मुंबईत सर्वधर्मीय शांती सभा घेणार : सर्व धर्माच्या प्रमुखांना सोबत घेऊन सर्व धर्मीय शांती सभेचे आयोजन मुंबई करण्यात आलं आहे. या सभेत शीख, जैन, हिंदू आणि ख्रिश्चन समाज सभेत सहभागी होणार आहे. आषाढी एकादशीमुळे मुंबईमधील हरिभक्त देखील उपस्थित राहणार आहेत. या सभेत राजकीय भूमिका असणार नाही.

हा कागदावरील वाद : राज्यकर्त्यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण होत आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा लोकांमधील वाद नाही तर कागदावरील वाद आहे. चार राज्यातील निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चिचत झाला आहे. याविषयी बारकावे आल्यानंतरचं सविस्तर बोलेण. ज्याप्रकारे बोलले जातं होत भाजपचा डाऊन फॉल सुरु झाला, मात्र ती वस्तुस्थिती नाही हे स्पष्ट झालं आहे.

मतपत्रिकेची मागणी : सर्व विरोधी पक्षांनी हिंमत दाखवून एकत्र येऊन निवडणुकीत मतपत्रिकेची मागणी केली पाहिजे. 2004 लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यावर मी म्हणलो होतो की, मला लोकांनी नाही पाडलं तर मला EVM ने पाडलं. त्यावेळी माझ्यावर हसले होते. मात्र यावर काँग्रेस बोलणार नाही. कायद्यात EVM किंवा बॅलेट वापरा असं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने यावर आपलं मत मांडावं. तर एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा आंबेडकर यांनी केलाय. काँग्रेस पक्षात यापूर्वी फूट पडलेली आहे, पडू शकते, शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली आमच्याकडे आमदार, खासदार नाहीत. मात्र आमच्या कार्यकर्त्यांना फोडू शकतील, भाजपा काहीही करू शकते. त्यांना काहीच अशक्य नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. Prakash Ambedkar Support Manoj Jarange : सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी...; प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा
  2. Prakash Ambedkar : महिलेची धिंड काढणाऱ्या भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा - प्रकाश आंबेडकर
  3. Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावर सरकार प्रामाणिक नाही; जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष- ॲड. प्रकाश आंबेडकर

Last Updated : Dec 5, 2023, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.