ETV Bharat / state

''भारतात बाहेरचे किती मुस्लीम आहेत, याची आकडेवारी 'त्यांनी' द्यावी'' - muslim community

पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुस्लिमांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे असे राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. रस्त्यावर ढोल वाजवणारे चिक्कार असतात, बेछूट आरोप करणाऱ्यांकडे आकडा आहे का? हे विचारा अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

भारतात बाहेरचे मुस्लिम किती आहेत हे सांगा, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

author img

By

Published : Jan 24, 2020, 8:05 PM IST

मुंबई - भारतात बाहेरचे मुस्लीम आहेत, किती आहेत हा आकडा त्यांनी दिली पाहिजे. ढोल वाजवणारे रस्त्यावर चिक्कार असतात. बेछूट आरोप करणाऱ्यांकडे आकडा आहे का? हे विचारा अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

भारतात बाहेरचे मुस्लीम किती आहेत हे सांगा, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

सीएए आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे निघाले, आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उडी घेतली आहे. या कायद्याच्या समर्थनात येत्या ९ फेब्रुवारीला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुस्लिमांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार असल्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर बोलत होते.

पाकिस्तान आणि बांगलादेशवरून किती मुस्लीम भारतात आले आहेत, हा आकडा त्यांनी सांगितला पाहिजे. ते १० आहेत की करोड आहेत हे समोर आले पाहिजे. कोणीतरी काहीतरी बोलतोय, यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यात काही सत्यता आहे का, हे बघणे आवश्यक आहे. गेली ७० वर्ष भारताची सुरक्षा करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहेत. यामध्ये गुप्तचर यंत्रणासह अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. असे विधान करून या यंत्रणेचे खच्चीकरण काम करण्याचे काम करू नये. कारण, अशा विधानामुळे या यंत्रणा काम करत नाही असा संदेश जातो. त्यामुळे आरोप करताना एकूण किती आकडा आहे हे समोर आले पाहिजे. बेछूट आरोप करू नये, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक

भीमा कोरेगाव प्रकरणावर काय म्हणाले आंबेडकर
शरद पवार यांनी पत्र लिहिलंय हे कळलं. जे अधिकारी यात आहेत, त्यांना ज्या नेत्यांनी हे करायला सांगितलं त्यांची नावे सांगितली पाहिजे. शरद पवार यांच्याकडे जी कागदपत्रे आहेत, ती त्यांनी जाहीर करावी. फोन हे प्रत्येक सरकारमध्ये टॅप केले जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळातही 'फोन टॅप' होत होते, असेही आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - भाजप सरकारकडून उद्धव ठाकरे, पवार, राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Intro:मुंबई। भारतात बाहेरचे मुस्लिम आहेत किती आहेत हा आकडा त्यांनी दिली पाहिजे. ढोल वाजवणारे रस्त्यावर चिकार असतात. बेछूट आरोप करणाऱ्यांनी त्यांच्याकडे आकडा आहे का? हे विचारा अशी टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांनी केली.Body:काय आहे प्रकरण
सी ए ए आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे निघाले आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उडी घेतली आहे. या कायद्याच्या समर्थनात येत्या ९ फेब्रुवारी आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुसलमानांना परत पाठवा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर बोलत होते.

पाकिस्तान आणि बांगलादेश वरून किती मुस्लिम भारतात आले आहेत, हा आकडा पहिला त्यांनी सांगितला पाहिजे. दहा आहेत की करोड आहेत हे समोर आले पाहिजे. कोणीतरी काय बोलतोय, यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यात काही सत्यता आहे का हे बघणे आवश्यक आहे. सत्तर वर्षात भारतासाठी सुरक्षा करण्यासाठी यंत्रणा काम करत आहेत. यामध्ये गुप्तचर यंत्रणासह अनेक यंत्रणा आहेत. असे विधान करून या यंत्रणेचे खच्चीकरण काम करण्याचे काम करू नये. कारण अशा विधानामुळे यंत्रणा काम करत नाही, असा संदेश जातो. त्यामुळे आरोप करताना एकूण किती आकडा आहे हे समोर आले पाहिजे. बेछूट आरोप करू नये, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव प्रकरणावर काय म्हणाले आंबेडकर
शरद पवार यांनी पत्र लिहिलंय हे कळाल.
जे अधिकारी यात आहेत, त्यांना ज्या नेत्यांनी हे करायला सांगितलं आहे त्यांची नावे सांगितली पाहिजे. शरद पवार यांचकडे जी कागदपत्रे आहेत ), ती त्यांनी जाहीर करावी

फोन हे प्रत्येक सरकार मध्ये टॅप केले जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळातही फोन टॅप होत होते, असेही आंबेडकर म्हणाले.

नोट

2 विडिओ आहेत

राज ठाकरे संदर्भात

आणि महाराष्ट्र बंद ची बातमी लागली बाईट या बातमीत पाठवत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.