मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranaut ) केलेल्या वक्तव्याला भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर ( Pragya Singh Thakur) यांनी समर्थन दिले आहे. आझादी म्हणजे काय? नेमके पहिले हे ठरवावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
काय म्हणाली होती कंगना रणौत?
भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranaut ) उधळली आहेत. यानतंर तिच्यावर अनेकांनी टीका केली. कंगनाला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
काय म्हणाल्या प्रज्ञासिंह ठाकूर?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतंकवाद्यांना कोणीही समर्थपणे उत्तर दिले नव्हते. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्याप्रमाणे देशाला समोर नेत आहे ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्यासारखे आहे. आझादी कशाला म्हणतात हा एक प्रश्नचिन्ह आहे. खऱ्या अर्थाने आझादी काय? ज्यावेळी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या विकास आणि उन्नती होते, सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य काम करण्याचे असते, ती खऱ्या अर्थाने आझादी असते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भारतावर पाकिस्तानने अनेक प्रकारे भारतावर हल्ले करत होता. ज्याप्रकारे भारताला स्वतंत्रता पाहिजे होती ती मिळत नव्हती. 2014नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच लोकांना स्वतंत्रता काय आहे, हे माहीत होत आहेस, असे म्हणत प्रज्ञासिंह यांनी अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्याचे समर्थन केले.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचेही कंगनाच्या वक्तव्याला समर्थन -
कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale) म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही, असे विधान त्यांनी केले होते. तसेच तुम्ही गोमूत्र प्या आणि गो पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते.
अशा लोकांनी कायमच पाकिस्तानला मदत केली, प्रज्ञासिंह ठाकूर यांची शाहरुख खानवर टीका
ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. त्यानंतर भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, हे ते लोकं आहेत जे असे म्हणतात की आम्ही सुरक्षित नाहीत. या लोकांनी नेहमीच पाकिस्तानला मदत केली आहे. इथे कमावतो, तिथे देतो. या लोकांनी भारताला कधीही मदत केली नाही.
हेही वाचा - 'स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार गांजाड्यांना झाला', सामनातून कंगनाची यथेच्छ धुलाई