मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा मॉर्निंग वॉकला गेले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर आज हल्ला केला. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशपांडे यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी विधान भवनात निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी देखील याबाबत खंत व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात माझ्यावर देखील असाच हल्ला झाला होता. त्याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, काही दिवसात हल्लेखोराला जामीन मिळाला. सरकारने अशांवर कठोर कारवाई करायला हवी होती. नेत्यांवर हल्ले होण्यामागे राजकीय पाठबळ असल्याचे दिसून येते, असे त्या म्हणाल्या.
हल्ले होणे ही काही सोपे नाही : एखाद्या आमदाराला किंवा राजकीय नेत्याला धमक्या येणे, हल्ले होणे हे काही सोपे नाही. कोणाचा तरी पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी घडू शकत नाही, असे सातव यांनी सांगितले. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला सुरक्षा वाढवून दिल्याचेही त्या म्हणाल्या. संदीप देशपांडे मनसेचे नेते आहेत. राजकीय क्षेत्रात चांगले काम करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालेला आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय लोकांनी बेसावध राहू नये असे मला वाटते. सभागृहात मनसेच्या आमदार आहेत. मनसे आता आमच्यात सहभागी झाली आहे. सभागृहात यासंदर्भात आम्ही आवाज उठवू, असे भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी पुढे आलीय, त्याला माझे समर्थन आहे, असे कोळंबकर यांनी म्हटले.
सध्या राजकीय वातावरण बिघडले : सध्या राजकीय वातावरण बिघडले आहे. बलाढ्य राजकीय नेते विधानभवनात होऊन गेले. परंतु कधीही वैयक्तिक ठेवेदावे त्याने काढलेले नाहीत. आज राजकीय परिस्थिती वेगळी आहे. लोकांची काम बाजूला ठेवून एकमेकांची उणिधुनी काढत बसतात. आता राजकीय दर्जा घसरल्याचे कोळंबकर यांनी सांगितले. अतिशय निर्घुणपणे समाज माध्यमात काम करणार्या राजकिय नेत्यांवर हल्ले होत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. या मागे कोण आहे, हे आता सांगण कठीण आहे. मलाही धमकीचे फोन आले आहेत. पत्र आली आहेत, मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या मागे एक समान धागा आहे का ? हे पहावे लागेल. मात्र, राजकिय नेत्यांवर होणाऱ्या कुठल्याही हल्याचा निषेधच करतो, असे भाजपच्या आशिष शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा : Sanjay Raut News : संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार का? वादग्रस्त वक्तव्यावर हक्क भंग समितीची बैठक