ETV Bharat / state

Education Pattern Update : राज्यात तिसरीपासून सराव परीक्षा सुरू, नवीन शैक्षणिक वर्षांपासुन केरळ पॅटर्नचा अवलंब - Kerala Education pattern

राज्यातील प्राशमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आता शिक्षणाचा 'केरळ पॅटर्न' (Kerala Education pattern will be adopted from coming academic years) राबविणार आहे. त्यानुसार पुढील वर्षांपासुन तिसरीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सराव परीक्षा सुरु (Practice exam started in state from third Standard) करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या परिक्षा घेण्यात येतील, अशी माहिती समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प समन्वयक कैलास पगारे यांनी दिली. (Education Pattern Update) (Maharashtra State Education Pattern Update)

Education Pattern Update
राज्यात तिसरीपासून सराव परीक्षा सुरू
author img

By

Published : Nov 22, 2022, 3:17 PM IST

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाते. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे केवळ मूल्यमापन केले जाते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागत नाही, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अभ्यासाविषयी आणि शिक्षणाविषयी रुची कायम राहावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत, राज्य सरकारचे आहे. (Practice exam started in state from third Standard) (Kerala Education pattern will be adopted from coming academic years) (Education Pattern Update) (Maharashtra State Education Pattern Update)

प्रतिक्रिया देतांना प्रकल्प समन्वयक कैलास पगारे

विविध राज्यात दौरा : महाराष्ट्र वगळता अन्य शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेल्या राज्यांमध्ये शिक्षणाचा पॅटर्न कसा आहे? परीक्षा पद्धती कशी आहे? याचा अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी गेले होते. या अधिकाऱ्यांनी केरळ, राजस्थान, पंजाब, गोवा राज्यांच्या शिक्षण पद्धतीचा जवळून अभ्यास केला. केरळ राज्यातील शिक्षण पद्धती सर्वोत्तम (Kerala Education pattern will be adopted from coming academic years) असून; येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची व्यवस्था पाहिली जाते. विद्यार्थ्यांची दरमहा चाचणी घेऊन, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे ही पद्धत उत्तम असल्याचे मत, राज्यातील शिष्टमंडळाचे झाले आहे.

तिसरीपासून सुरू होणार परीक्षा : राज्यात गेल्या काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत, विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाते. त्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षकही फारसे लक्ष देत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दरमहा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेत जर विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नसेल, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी हा प्रयत्न होणार असल्याचे, पगारे यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धाचे आयोजन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हा सुद्धा राज्य शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण समृद्धी केंद्र उभारणार : राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख लक्षात यावा. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत लक्ष देता यावे, यासाठी आता पुण्यात शिक्षण समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे. या शिक्षण समृद्धी केंद्राच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थीची माहिती ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणात मागे पडणार नाही, असा दावाही पगारे यांनी केला. (Education Pattern Update) (Maharashtra State Education Pattern Update)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.