ETV Bharat / state

मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा - मंत्रालय न्यूज

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनात अंधार परसला होता. जवळजवळ २० मिनिटे मंत्रालायातील लाईट बंद होती. मात्र, केवळ ७ मिनिटात वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : Mar 19, 2021, 12:12 PM IST

Updated : Mar 19, 2021, 2:54 PM IST

मुंबई- मंत्रालयातील वीज यंत्रणेत बिघात झाला होता. मंत्रालयातील एका फेजमध्ये बिघाड झाल्यामुळे मंत्रालायाच्या मुख्य इमारतीतील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आता वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनात अंधार परसला होता. जवळजवळ २० मिनिटे मंत्रालायातील लाईट बंद होती. मात्र, केवळ ७ मिनिटात वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.

मेट्रो कामामुळे वीज पुरवठा खंडित

मुंबईत चाललेल्या मेट्रो कामामुळे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या २० मिनिटांपासून वीज पुरवठा बंद आहे. परिणामी अनेक अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनात अंधार पसरला होता. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने बत्ती गुल झाली होती. यामुळे सरकारवर टीका करण्यात आली होती.

हेही वााचा- एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

७ मिनिटात वीज पुरवठा पूर्ववत -
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाद्वारे परिवहन आणि वीज सेवा पुरवली जाते. मुंबई शहर विभागात बेस्ट उपक्रमाकडून वीज पुरवठा केला जातो. मंत्रालय परिसरातील वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टच्या फीडरमधील बिघाडामुळे मंत्रालय, फोरशोर रोड आणि महर्षि कर्वे रोड या परिसरात विद्युत पुरवठा सकाळी ११.५५ वाजता खंडित झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच बेस्टच्या अभियंता आणि तंत्रज्ञांनी केवळ ७ मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत केल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.

१२ ऑक्टोबरची आठवण -
आज मंत्रालय परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वाना १२ ऑक्टोबरची आठवण झाली. १२ ऑक्टोबरला सकाळी १०.१५ च्या सुमारास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आदी जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला होता. एकाच वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने जागतिक दर्जाचे शहर आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. टाटाच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका बसला होता. त्यामुळे अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापुरातील वीज पुरवठा बंद पडला होता.

हेही वााचा- अँटिलिया प्रकरण : आतापर्यंत 5 गाड्या जप्त; प्रकरणांचं वाढतंय गूढ

Last Updated : Mar 19, 2021, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.