मुंबई - शहर व उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे या तलावावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.
आज आतिवृष्टी होणार असल्याची हवामान विभागाने माहिती दिल्यानंतर प्रशासनाने मुंबईमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी पवई तलावावर गर्दी केली आहे.
पवई तलावातील गाळ यावर्षी काढण्यात आला नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णीनीचे प्रमाण वाढले आहे. सध्या पवई तलाव पूर्णपणे भरला असून यातून जाणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते.