ETV Bharat / state

धारावीमध्ये तमिळ बांधवांकडून 'पोंगल' उत्साहात साजरा - पोंगल उत्सव

तमिळ बांधवांनी धारावीमध्ये पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला आहे. या सर्व उत्सवाचा आढावा आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी घेतला आहे.

pongal-celebration-in-dharawi
धारावीमध्ये तमीळ बांधवांकडून 'पोंगल' उत्साहात साजरा
author img

By

Published : Jan 15, 2020, 12:44 PM IST

मुंबई - उगवत्या सूर्याला वंदन करत बुधवारी धारावीतील हजारो तमिळ नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला. पहाटे रंगलेला अविस्मरणीय सोहळा टिपण्यासाठी धारावीतल्या नाईन्टी फूट रस्त्यावर स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. पारंपरिक उत्सव साजरा करण्यासाठी तमिळ बांधव मोठ्या उत्साहात आणि आनंदात असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले.

धारावीमध्ये तमीळ बांधवांकडून 'पोंगल' उत्साहात साजरा

हेही वाचा - शरद पवार काल, आज आणि उद्याही आमचे 'जाणता राजा'च.. मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

धारावीमध्ये तसेच मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर याठिकाणी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मकरसंक्रात म्हणजे दक्षिणेत पोंगल म्हणून साजरा केला जातो. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. पोंगल हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशुधनाची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीच्या उत्सवात तमिळ भगिनींचा मोठ्या प्रमाणात आज हिंदी भाषिक लोक देखील या ठिकाणी सहभागी झाल्याचे दिसले. उत्सवानिमित्ताने धारावीत एक हजार पेक्षा अधिक चुली मांडल्या गेल्या होत्या. त्यामुळे धारावीतील अत्यंत वर्दळीचा नाईंटी फूट रस्ता काही काळासाठी एक मार्गी करण्यात आला होता. या सामूहिक उत्सवाचे आयोजन हिंदू युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते.

पोंगल काय आहे?

तमिलार तिरूनाल हिंदू एक सण म्हणजे पोंगल आहे. याला महाराष्ट्रात मकर संक्रात असे म्हटले जाते शेतातील पिकलेले धान्य कापून घरी आणल्यानंतर दक्षिणेत हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच मुंबईत दक्षिणेतील तमिळ समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. ते मुंबईत व्यवसायासाठी आणि रोजगारासाठी आले असल्यामुळे त्यांना गावी जाता येत नाही. त्यामुळे हा आपला पारंपरिक सण ते मुंबईत धारावी याठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्ष अगोदर जुन्या परंपरेने करतात. पोंगल हा सण तीन दिवस साजरा करतात यानिमित्ताने उसाला आणि भाताला मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात येते. पूजेसाठी आणि प्रसादासाठी त्याचा वापर करतात. पूजेला ते तांदळाची खीर बनवून पहिल्या दिवशी पहाटे सूर्य देवाची पूजा करत नैवेद्य देवाला देतात.

तमिळ समाजातील बांधव यांनी पोंगल सण साजरा केला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...

Intro:धारावीत पोंगल उत्साहात

उगवत्या सूर्याला वंदन करीत आज धारावीतील हजारो नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरी केली पहाटे रंगलेला अविस्मरणीय सोहळा टिपण्यासाठी धारावीतल्या नाइन्टी फूट रस्त्यावर स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले होते पारंपारिक उत्सव साजरा करण्यासाठी तमिल बांधव मोठ्या उत्साहात आणि आनंदात असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले

Body:धारावी मध्ये तसेच मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मकर संक्रात म्हणजे दक्षिणेत पोंगल म्हणून साजरा केला जातो सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेलाच येतो हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो हा उत्सव तीन दिवस असतो पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी घरातील पशुधनाची पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीच्या उत्सवात तमीळ भगिनींचा मोठ्या प्रमाणात आज हिंदी भाषिक लोक देखील या ठिकाणी सहभागी झाल्याचे दिसले उत्सवानिमित्ताने धारावीत एक हजार पेक्षा अधिक चुली मांडल्या गेल्या होत्या त्यामुळे धारावीतील अत्यंत वर्दळीचा नाईंटी फूट रस्ता काही काळाकरता एक मार्गी करण्यात आला होता या सामूहिक उत्सवाचे आयोजन हिंदू युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते

Conclusion:पोंगल काय आहे

तमिलार तिरूनाल हिंदू एक सण म्हणजे पोंगल आहे याला महाराष्ट्रात मकर संक्रात असे म्हटले जाते शेतातील पिकलेले धान्य कापून घरी आणल्यानंतर दक्षिणेत हा सण साजरा केला जातो त्यामुळेच मुंबईत दक्षिणेतील तमिळ समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात राहतात ते मुंबईत व्यवसायासाठी आणि रोजगारासाठी आले असल्यामुळे त्यांना गावी जाता येत नाही त्यामुळे हा आपला पारंपरिक सण ते मुंबईत धारावी याठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्ष अगोदर जुन्या परंपरेने करतात पोंगल हा सण तीन दिवस साजरा करतात यानिमित्ताने उसाला आणि भाताला मोठ्या प्रमाणात महत्त्व देते पूजेसाठी आणि प्रसादासाठी त्याचा वापर करतात पूजेला ते तांदळाची खीर बनवून पहिल्या दिवशी पहाटे सूर्य देवाची पूजा करत नैवेद्य देवाला देतात

हा पोंगल सणाचा चांगला दिवस आज होता या पहिल्या दिवशी धारावी तमिल समाजातील बांधव यांनी पोंगल सण साजरा केला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.