ETV Bharat / state

आचारसंहितेनंतरही मुंबईत राजकीय होर्डिंग्स, पालिकेचे दुर्लक्ष - दुर्लक्ष

आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. त्यामुळे पालिकेकडून या होर्डिंग्सवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai
author img

By

Published : Mar 13, 2019, 7:15 PM IST

मुंबई - फुकटची जाहिरात करण्यासाठी फलक आणि होर्डिंग्सचा आधार राजकीय पक्ष तसेच कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. रविवारी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. त्यामुळे पालिकेकडून या होर्डिंग्सवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आचारसंहिता लागण्याआधी मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आणि उद्धाटने केली जातात. त्यासाठी अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि नेत्यांचे फलक आणि होर्डिंग्स लावले जातात. वास्तविक पाहता संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन आणि भुमीपूजन झाल्यावर संबंधित फलक, होर्डिंग काढणे गरजेचे आहे. मात्र, आचारसंहिता लागून २ दिवस झाले तरीही, अनेक ठिकाणचे होर्डिंग्स काढण्यात आलेले नाहीत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी कारवाई सुरू आहे, असे होर्डिंग्स दिसल्यास ती जप्त करून कारवाई केली जात असल्याचे सांगितले.

आचारसंहितेनंतरही मुंबईत राजकीय होर्डिंग्स

२०१८ मध्ये महापालिकेने ११ हजार २०२ होर्डिंग्ज आणि फलक काढले होते. यापैकी राजकीय पक्षांच्या होर्डिंग्सचे प्रमाण ६ हजार ५३५ होते, त्यापैकी २ हजार ८३ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. २०१७ मध्ये महापालिकेने १६ हजार ४१३ होर्डिंग्स काढले होते. यापैकी १३ हजार ३१२ राजकीय होर्डिंग्स होते. बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करताना २ शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

Intro:मुंबई - (निवडणूक विशेष बातमी)
फुकटची जाहिरात करण्यासाठी फलक आणि होर्डिंग्सचा आधार राजकीय पक्ष तसेच कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. रविवारी लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाली. मात्र त्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग नाक्या नाक्यावर दिसत असल्याने पालिकेकडून या होर्डिंगवर कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Body:निवडणूका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागण्याआधी मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आणि उदघाटने केली जातात. त्यासाठी ठिकठिकाणी राजकीय पक्ष आणि नेत्यांचे फलक आणि होर्डिंग्स लावले जातात. वास्तविक पाहता संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उदघाटन आणि भुमीपूजन झाल्यावर संबंधित फलक, होर्डिंग काढणे गरजेचे आहे. मात्र आचारसंहिता लागून दोन दिवस व्हायला आले तरी अनेक ठिकाणी फलक, होर्डिंग आहे तसेच दिसत आहेत. होर्डिंग्स अद्यापही मुंबईत अनेक ठिकाणी आहे तशीच असल्याने याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमची कारवाई सुरु आहे, असे होर्डिंग्स दिसल्यास ती जप्त करून कारवाई केली जात असल्याचे पालिकेने सांगितले.

२०१८ मध्ये महापालिकेने ११ हजार २०२ होर्डिंग्ज आणि फलक काढले. यापैकी राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जचे प्रमाण ६ हजार ५३५ होते, त्यापैकी २ हजार ८३ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. २०१७ मध्ये महापालिकेने १६ हजार ४१३ होर्डिंग काढले होते. यापैकी १३ हजार ३१२ राजकीय होर्डिंग्ज होते. बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करताना दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईमधील होर्डिंग्स काढण्याची कारवी सुरु असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे फलक निदर्शनास येत असल्याने पालिकेकडून त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

सोबत राजकीय पक्षांच्या बॅनरचे vis पाठवले आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.