ETV Bharat / state

Look Back 2022 : सरत्या वर्षातील राजकारणामधले ऐतिहासिक बंड; जगाने घेतली होती दखल - year ender maharashtra politics

( Year Ender 2022 ) महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघार्षाने सन 2022 ( Political Crisis in 2022 ) या वर्षाची राजकीय इतिहासाने नोंद घेतली. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल आल्यापासून ते महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होईपर्यंतचा प्रवासातील सत्तासंघर्ष देशभरात चांगलाच गाजला. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 40 आमदारांसह गुवाहाटीत जाऊन बंड केले. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. शिंदे गटाच्या आमदारांना भाजपने पाठिंबा दिल्यामुळे शिंदे- फडवणीस सरकार सत्तेत विराजमान झाले. जूनपासून सुरू झालेल्या या संपूर्ण सत्तासंघार्षातील ( Political Crisis in Maharastra ) घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊयात. Look Back 2022

Year Ender 2022
वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी
author img

By

Published : Dec 19, 2022, 9:18 PM IST

Updated : Jan 1, 2023, 7:35 AM IST

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकटाची ( Political Crisis in Maharastra ) सुरुवात 21 जून 2022 रोजी विधानपरिषदेच्या निकालानंतर सुरूवात झाली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतर अनेक आमदारांना सोबत घेऊन आधी गुजरातमधील सुरत येथे तर यानंतर गुवाहाटीत जाऊन बंड पुकारले. दरम्यान, तब्बल नऊ दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे थेट जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री तसेच विधानपरिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे विधानभवनातील अविश्वासाचा ठराव रद्द झाला. भाजपने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची 30 जून रोजी राजभवनात शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडाने 20 ते 30 जून या दहा दिवसांत महाराष्ट्राचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले. Look Back 2022

महाविकास आघाडी सरकार : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर जनतेने महायुतीला कौल दिला होता. पण भाजप व शिवसेना यांच्या अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेने भाजपसोबत असलेली युती तोडली. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापन केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यात 3 वर्षांचा कारभार सांभाळला. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले.

शिंदे गटाचे बंड : विधान परिषदच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक संपर्काच्या बाहेर गेले. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले. या बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये पहिल्यांदा याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतहून गुवाहाटीला गेले. शिंदे गटाचे आमदार सुरतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण बैठकीत 10-12 आमदारही अनुपस्थित आढळून आले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद पदावरून हटवले. शिंदेंविरुद्ध कारवाईचा इशारा देत शिवसेनेने अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त केले. तसेच सुनील प्रभू यांची नियुक्ती प्रतोद म्हणून करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी याला प्रत्युत्तर देत भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. शिवसेनेचे अधिक आमदार शिंदे गटात सामिल होऊ नये यासाठी त्या आमदारांना मुंबईतील स्पेशल हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा : एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. शिंदे गटातील आमदारांकडून महाविकास आघाडीसोबतची अनैसर्गिक युती तोडून आणि भाजपसोबत नैसर्गिक युती करत सरकार स्थापन करण्याची मागणी झाली. त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री व विधानपरिषद पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडत खासगी निवासस्थानी मातोश्रीवर परतले. दरम्यान, वर्षा ते मातोश्री दरम्यान त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिले.

महाविकास आघाडी सरकार कोसळले : भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्षातील एकूण आमदारांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना 37 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे, 23 जून रोजी एकनाथ शिंदे यांना 37 आमदारांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले. शिवसेनेने तब्बल 17 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे पत्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांना दिले. तर दुसरीकडे 26 जून रोजी तत्कालीन विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव फेटाळल्याबद्दल , एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 27 जून रोजी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आणि उपसभापती झिरवाल यांना त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. शिंदे यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना 10 दिवसांच्या आत 'शिवसेना नेते' पदावरून हटवले. परिणामी यामुळे अखेर, महाविकास आघाडी सरकार कोसळले.

शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत : एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी गुवाहाटीवरून गोव्याकडे प्रयाण केल्यानंतर 30 जून रोजी काही आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणीऐवजी थेट देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचा शपथविधी राजभवनात होणार असल्याची माहिती समोर आली. अखेर, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले महाराष्ट्रातील अभूतपूर्व राजकीय नाट्य संपले. भाजपने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे 30 जून रोजी राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

शिंदे मुख्यमंत्री तर फडवणीस उपमुख्यमंत्री : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. या संपूर्ण घडामोडीनंतर राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा महाराष्ट्रात रंगली होती. दरम्यान, देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषद घेत भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होतील, अशी घोषणा केली. तसेच मी स्वतः सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पण, पुढील 2 तासांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री म्हणून घोषणा ही बाब ह्या संपूर्ण घडामोडीतील महाराष्ट्राला चकित करणारी होती.

शिवसेनाचा वाद न्यायालयात : जून महिन्याच्या अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे आणि इतर 39 आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यानंतर कोसळले. यातूनच पुढे शिवसेनेत एक गट ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागला गेला. एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद सुरू आहेत.

Last Updated : Jan 1, 2023, 7:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.