मुंबई - भाजपला जनतेने बहुमताचा कौल दिला नसल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॅावर वाढली आहे. मात्र, भाजप सहजासहजी शिवसेनेच्या मागण्यांना जुमाणणार नसल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव
मुंबईतल्या 36 पैकी तब्बल तीस जागा भाजप आणि शिवसेना महायुतीने पटकवल्या आहेत. शहरी भागातल्या मतदारांनी महायुतीला भरभरून मत दिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले. मात्र शहरी भागात नागरी प्रश्नांपेक्षा धार्मिक ध्रुवी करणावरच मतदान होतंय की काय? असा प्रश्न आता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कराड दक्षिण'वर पुन्हा पृथ्वी'राज'!